Anand Mahindra Tweet: भारतातील प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा कंपनीचे सीईओ आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी वंदे भारत ट्रेनशी संबंधित एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. जी बेंगळुरू-म्हैसुरू एक्सप्रेसवेच्या खालून जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते हा व्हिडिओ केवळ पसंत करत नाही आहेत तर भारतात वेगाने होत असलेल्या जागतिक दर्जाच्या विकासकामांचे कौतुकही करत आहेत.

वास्तविक, आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला, जो बंगळुरू-म्हैसूरच्या १० लेन एक्सप्रेसवेचा आहे, ज्याच्या खालून भारतातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत जात आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे हा ड्रोनमधून शूट करण्यात आला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी लिहिले की, बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवेच्या खालून जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा नवीन ड्रोन शॉट. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा भारताला कशा प्रकारे बदलत आहेत याचे हे दृश्य एक शक्तिशाली प्रतीक आहे.

( हे ही वाचा: दाढी करून आलेल्या वडिलांना पाहून चिमुरड्याने दिली भन्नाट प्रतिक्रिया; चेहऱ्यावरील ‘तो’ भाव पाहून प्रेक्षकही झाले फिदा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर आनंद महिंद्राच्या (Anand Mahindra) या व्हिडिओला लोक पसंत करत आहेत, ज्यामध्ये वापरकर्ते वंदे भारत तसेच पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या बदलांचे कौतुक करताना दिसत आहेत. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ २४ तासांत १.७ दशलक्ष लोकांनी पाहिला असून सुमारे ५ हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.