भारतातील सर्वात श्रीमंत आणि मुरब्बी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. ६२ व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांचं निधन झाल्याची बातमी सकाळीच प्रसारमाध्यमांवर झळकली आणि अनेकांना धक्का बसला. भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून चांगला पैसा कमावता येतो आणि तो टिकवताही येतो, याचा वस्तुपाठ घालून देणारे झुनझुनवाला हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३६ व्या स्थानी होते. फोर्ब्सच्या यादीनुसार झुनझुनवालांची एकूण संपत्ती ४६,००० कोटी इतकी आहे. झुनझुनवाला यांच्या निधनाला एक आठवडा उलटून गेल्यानंतरही त्यांच्यासंदर्भातील बातम्या आणि किस्से सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. झुनझुनवाला यांच्यासंदर्भातील अशीच एक पोस्ट रविवारी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी, “राकेशने दिलेला गुंतवणूकीचा सर्वोत्तम सल्ला” असं म्हणत शेअर केली आहे.

नक्की वाचा >> राकेश झुनझुनवालांच्या २९ हजार ७०० कोटींच्या शेअर्सचं काय होणार?

आनंद महिंद्रा हे सोशल नेटवर्किंगवर खास करुन ट्विटरवर फारच सक्रीय आहेत. अनेकदा ते या माध्यमातून आपलं मत मांडताना व्हायरल व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत असतात. अशीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली असून ही पोस्ट काही वर्षांपूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी दिलेल्या मुलाखतीसंदर्भातील आहे. या मुलाखतीमधील काही मजकूर असणारा स्क्रीशॉट आनंद महिंद्रांनी ट्विटवरुन एका सुंदर कॅप्शनसहीत शेअर केला आहे.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
mumbai accident, mumbai accident 2 died
मुंबई: हेल्मेटशिवाय दुचाकीवरून तिघांची सफर जीवावर बेतली; दोघांचा मृत्यू, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती

“ही पोस्ट फार मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. आयुष्याच्या शेवटी राकेशने सर्वात मौल्यवान आणि फायद्याच्या गुंतवणुकीबद्दल सल्ला दिला होता. हा सल्ला कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचा आहे. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेची गुंतवणूक करायची आहे. पैशांची नाही,” अशा कॅप्शसहीत आनंद महिंद्रांनी व्हायरल होत असणाऱ्या एका मुलाखतीमधील मजकुराचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

या व्हायरल पोस्टमध्ये इकनॉमिक टाइम्सला राकेश झुनझुनवाला यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या एका विधानाचा संदर्भ देण्यात आला आहे. “माझी सर्वांत वाईट गुंतवणूक ही माझ्या आरोग्यासंदर्भात होती. मी सर्वांना या गोष्टीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करावी असा सल्ला देईन,” असं राकेश झुनझुनवाला म्हणाले होते. “यावरुन २१ हजार कोटींहून अधिक संपत्ती असणारे झुनझुनवाला हे त्यांच्या आरोग्याबद्दल समाधानी नाहीत. त्यांच्याकडे श्रीमंती आहे मात्र ते इतरांना आरोग्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत,” असंही या लेखात लिहिण्यात आलं होतं. हा लेख २३ डिसेंबर २०१९ चा असल्याचं स्क्रीनशॉटवरुन स्पष्ट होत आहे.

झुनझुनवाला यांना आरोग्यासंदर्भातील बऱ्याच समस्या होत्या. १४ ऑगस्ट रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. गुंतवणुकीतून संपत्ती निर्मितीचे झुनझुनवाला यांचे कर्तृत्व, सामान्य गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्याबद्दल वलय आणि आदर निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्यांच्या गुंतवणुकीचा परिसस्पर्श झालेल्या अशा कंपन्यांमध्ये चढाओढीने गुंतवणूक केली जाण्याची प्रथाच निर्माण झाली होती. पाच हजार रुपयांच्या भांडवलासह सुरुवात करीत, सुमारे ४६,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह झुनझुनवाला यांनी ‘फोर्ब्स’च्या २०२१ सालच्या सूचीनुसार भारतातील ३६ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश म्हणून स्थान कमावण्यापर्यंत मजल मारली.