आता मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असून सर्वत्र पावसाचा जोर असल्याचं दिसून येतंय. पाऊस म्हटलं की अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी… तसेच पावसाळा म्हटलं की आणखी एक गोष्ट आवर्जून आपल्यासमोर येते आणि ती म्हणजे ट्रेकिंग. पाऊस सुरू झाला की अनेकांची पावलं गड-किल्ल्यांकडे वळतात. तरुणाईमध्ये ट्रेकिंगला जाण्याचं वेगळंच क्रेझ असतं. अशातच आता उद्योगपती आनंद महिंद्रांनीही एका गडावर ट्रेकिंगला जायची इच्छा व्यक्त केलीय. त्यांनी एका गडाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रांनी कलावंतीण दुर्गवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, सोबतच कलावंतीण दुर्गवरचा एक थरारक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ ट्विट करून लिहिले, “मी कबूल करतो की मला या ठिकाणाविषयी काहीच माहिती नव्हती. मी आव्हानासाठी तयार आहे की नाही हे शोधून काढावे लागेल! कलावंतीण दुर्गच्या माथ्यापर्यंतचा ट्रेक हा पश्चिम घाटातील सर्वात कठीण मानला जातो. जवळजवळ ६०-अंशांची हा झुकलेला कडा आहे.

व्हिडिओमध्ये पर्यटक कलावंतीण दुर्गच्या शिखरावर ट्रेकिंग करताना दिसत आहेत. पायर्‍यांमुळे हा ट्रेक खूपच भीतीदायक वाटतो. यावेळी या ट्रेकरने GoPro वर हा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, पाय घसरला अन्…ठाणे स्टेशनवरचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडिंवर ते रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात. अनेकदा त्यांच्या व्हिडीओंमधून तरुणांना नवं काही तरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते.