२०२३ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. २००३ च्या विश्वचषकानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत भिडतील. हा अंतिम सामना रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या फायनलपूर्वी एका खास एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेची ‘सूर्य किरण एरोबॅटिक टीम’ एअर शो सादर करणार आहे. आनंद महिंद्रांनी अंतिम सामन्यापूर्वी एअर शोसाठी सराव करणार्‍या भारतीय हवाई दलाचा एक अविश्वसनीय व्हिडिओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर)  शेअर कलाय.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम थरार उद्या याच स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याचा थरार वाढवण्यासाठी भारतीय हवाई दल देखील सज्ज झाले आहे. हवाई दलाची सूर्यकिरण टीम एरोबेटिक प्रदर्शन सामना सुरु होण्यापूर्वी करणार आहे. सूर्य किरण टीम त्यांच्या ‘एअर शो’ साठी ओळखली जाते. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करेलं. या शोसाठीचा सरावही याच मैदानात होत असून या एअर शोच्या सरावाचा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी शेअर केला आहे.

(हे ही वाचा: Ind vs Aus Final: ऑस्ट्रेलिया २ बाद ४५०! मार्शच्या भाकितावर तुफान मीम्स व्हायरल; म्हणे, “यांना महाराज, शम्सी आवरेनात आणि…!”)

आनंद महिंद्रा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, मोटेरा येथील टेक महिंद्रा इनोव्हेशन सेंटरची देखरेख करणारे माझे सहकारी मनीष उपाध्याय यांनी विश्वचषक फायनलसाठी IAF चा सराव करतानाची ही क्लिप घेतली. या व्हिडिओची सुरुवात राष्ट्रगीताने होत असून संपूर्ण मैदान यात गुंजलेला दिसत आहे. आयएएफच्या सराव ड्रिलची एक झलक दर्शवून हा व्हिडिओ संपतो. काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडिओला अनेक लोकांनी पसंत केले आहे. तर अनेक लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया पण दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर एक्स वापरकर्त्यांनी म्हटले, “खूप छान व्हिडिओ ” तर दुसऱ्यांनी म्हटले, ”नक्कीच सर्वोत्कृष्ट देखावा होणार आहे” बऱ्याच लोकांनी या व्हिडिओवर छान छान प्रतिक्रियाही दिल्या आहेत.