scorecardresearch

Premium

हत्तीचा वाढदिवस! अशा अनोख्या स्टाईलमध्ये गजराजने मानले आभार, VIRAL VIDEO पाहून आनंद महिंद्रा सुद्धा फिदा!

आता हे ऐकून तुम्हाला सुरूवातीला आश्चर्य वाटेल. हत्तीचा वाढदिवस नेमका कसा असतो, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहावा लागेल.

Elephant-Birthday
(Photo: Twitter/ anandmahindra)

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या मनोरंजक ट्विट आणि कमेंट्समुळे ट्विटरवर नेहमीच प्रसिद्धीझोतात येत असतात. आनंद महिंद्रा वेगवेगळ्या विषयांवर ट्विट करत असतात आणि त्यावर आपलं मतही मांडतात. त्यांचे अनेक ट्विट खूप प्रेरक असतात, तर अनेक खूप मजेदार असतात. नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी हत्तीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लोक हत्तीचा वाढदिवस साजरा करत आहेत. आता हे ऐकून तुम्हाला सुरूवातीला आश्चर्य वाटेल. हत्तीचा वाढदिवस नेमका कसा असतो, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तीच्या अवतीभवती भरपूर लोक उभे असलेले दिसून येत आहेत. सारेच जण या हत्तीसाठी टाळ्यांच्या कडकडाटात ‘Happy Birthday’ सॉंग गाताना दिसून येत आहेत. लोक त्याच्यासाठी गाणं गात असताना हत्ती सुद्धा एन्जॉय करताना दिसून येतोय. त्याच्या वाढदिवशी झालेलं हे सेलिब्रेशन पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकताना दिसून येतोय. आपली मान हालवून तो आपला वाढदिवस एन्जॉय करतोय. त्याच्या वाढदिवशी भेट म्हणून लोकांनी त्याला आवडते फळ त्याच्या पुढ्यात मांडलेले दिसून येत आहेत. त्याच्या या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये गोड गोड फळांचा आस्वाद देखील घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ खूपच गोड आहे. या व्हिडीओमधला क्यूट हत्ती साऱ्यांचंच मन जिंकून घेतोय.

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! अजबच…चक्क बकरीसोबत केलं लग्न, घेतली सोबत जगण्या मरण्याची शपथ!

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सुद्धा या गोंडस हत्तीच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “ही क्लिप तिरुवनाइकावल मंदिरातील (तामिळनाडू) आहे, जिथे अकिला नावाच्या हत्तीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा व्हिडीओ हत्तीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे…” यापुढे लिहिताना ते म्हणाले, “मला त्याची टिपिकल देसी स्टाईल आणि डोकं हलवणं आवडलं. जर तुम्हालाही आनंदी व्हायचे असेल तर ही क्लिप पाहण्यासाठी चांगली आहे.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या रिक्षातून बाळ रस्त्यावर पडलं, अन् जीव धोक्यात घालून ट्रॅफिक पोलिसाने वाचवले प्राण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘स्पायडर मॅन’ने आकाशात उंचावर उडी घेत केला स्टंट पण…; खतरनाक VIDEO VIRAL

या व्हायरल व्हिडीओमधल्या गोंडस हत्तीला त्याच्या वाढदिवशी छान सजवण्यात देखील आलंय. हा व्हिडीओ तामिळनाडूमधल्या तिरुवनाइकावल मंदिर परिसरातला आहे. या गोंडस हत्तीचं नाव अकिला असून लोकांनी केलेलं हे सेलिब्रेशन पाहून तो जणू काही आपली मान हलवून त्यांचे आभार मानतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला सात लाख सहा हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर कमेंट हत्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra tweet elephant celebration video and said cheering up prp

First published on: 13-06-2022 at 18:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×