राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या चिंताजनक घटनांच्या मालिकेनंतर, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या प्रचंड दडपणाबद्दल महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली आणि त्यांना आठवण करून दिली की, ”त्यांनी आयुष्याच्याया टप्प्यावर त्यांची योग्यता सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला “शोधण्यावर” लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

महिंद्राने विद्यार्थ्यांबद्दल व्यक्त केली सहानुभूती

टविट् करत ते म्हणाले की, “या बातमीने मला तुमच्याइतकाच त्रास झाला आहे. अनेक उज्ज्वल भविष्ये संपत असल्याचे पाहून वाईट वाटते. माझ्याकडे सांगण्यासारखे कोणतेही मोठे शहाणपण नाही. पण मी कोटातील प्रत्येक विद्यार्थ्याला सांगू इच्छितो की, आयुष्याच्या या टप्प्यावर तुमचे ध्येय स्वतःला सिद्ध करणे नाही तर स्वतःला शोधणे आहे. परीक्षा उत्तीर्ण न होणे हा आत्म-शोधाच्या प्रवासाचा एक भाग आहे. याचा अर्थ तुमची खरी प्रतिभा कुठेतरी आहे. शोधत राहा, प्रवास करत रहा. महिंद्रा यांनी लिहिले की, ”अखेर तुम्ही ते शोधून काढाल आणि तुमच्यामध्ये सर्वोत्तम काय आहे हे तुम्हाला समजेल.

हेही वाचा – केरळची कासवू साडी नेसून स्केटिंग करत चिमुकलीने दाखवला ‘ओणम स्वॅग’! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल तिचे फॅन

प्रीमियर कोचिंग संस्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोटाला दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी भेट देतात, जिथे ते स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतात. परंतु स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आत्महत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे, ज्यामुळे ही प्रणाली तरुणांच्या मनावर आणि मानसिक आरोग्यावर किती मोठा ताण आणू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी रविवारी ४ तासांच्या अंतराने आत्महत्या केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये आतापर्यंत २४ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे – जे इतर वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.