Anant Ambani Watch Price: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा रंगला आहे. १ मार्चपासून तीन दिवस हा कार्यक्रम झाला. तीन दिवसांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची रविवारी अखेरचा दिवस होता. फंक्शनसाठी संपूर्ण बॉलीवूडसह अनेक दिग्गजांची मंदियाळी सध्या जामनगरमध्ये पाहायला मिळाली. दरम्यान याच सोहळ्यातील अनंत अंबानी यांच्या हातातील घड्याळाची जोरदार चर्चा आहे. सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अनंत अंबानी, आकाश अंबानी, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन दिसत आहेत. अनंत आणि आकाश अंबानी झुकरबर्ग दाम्पत्याला त्यांचा नवीन उपक्रम ‘वंतारा’ला भेटा द्यायला सांगत आहेत. त्यानंतर झुकरबर्गच्या पत्नीने अनंत अंबानींच्या मनगटावरचे घड्याळ पाहिले आणि हात लावून पाहिले. मार्क झुकरबर्गची पत्नी प्रिसिला चॅन यांनी अनंत अंबानी यांच्या आलिशान घड्याळाचे कौतुक केले. व्हिडिओमध्ये दिसत आहे, चॅनने अनंतच्या लग्झरी घड्याळाचे कौतुक केले आणि म्हटले – ‘तुमचे घड्याळ अप्रतिम आहे, खूप छान आहे.’ नंतर चॅन यांनी घडाळ्याच्या निर्मात्याबद्दल विचारले, ज्यावर अनंत यांनी ‘रिचर्ड मिल’ असे उत्तर दिले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जेव्हा वाहतूक पोलिसच वाहतुकीचे नियम मोडतात! वांद्रे-वरळी सी लिंकवरील VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंत अंबानींचं हे आलिशान घड्याळ तब्बल १४ कोटी रुपयांचं आहे. या घड्याळाचं नाव Audemars Piguet Royal Oak Open Worked Skeleton असं आहे. ‘इंडियन हॉरोलॉजी’ या इन्स्टाग्राम पेजवरून या घडाळ्याबाबत माहिती देण्यात आली आहे. या घडाळ्यात अनेक प्रकारचे फिचर्स आहेत.

मार्क झुकरबर्ग हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहेत. तर भारतासहित आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमांकवारीत ९ व्या स्थानावर आहेत.