एका व्यक्तीला त्याच्या वडिलांनी केवळ ७ हजार रुपयांमध्ये विकत घेतलेल्या घड्याळ्याच्या बदल्यात जवळपास ४० लाखांहून अधिक रुपये मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी विकत घेतलेले एक घड्याळ लिलावात लाखो रुपयांना विकले गेले. शिवाय त्याला मिळालेल्या पैशांतून एखादी लक्झरी कार खरेदी करु शकतो. पण केवळ ७ हजाराच्या घड्याळाला ४० लाख रुपये का मिळाले ? ते जाणून घेऊया.
रिपोर्टनुसार, हे अँटिक एक घड्याळ आहे, जे स्विस कंपनी रोलेक्सने बनवले होते. काही दशकांपुर्वीचे असणारे हे घड्याळ आताही व्यवस्थित सुरु आहे. शिवाय या घड्याळाला स्वतःचा असा इतिहास आहे. त्यामुळे ते ४० लाखांहून अधिक किंमतीत विकले गेले. तर हे घड्याळ TW Gaze ने आयोजित केलेल्या ऑनलाइन लिलावात विकलं गेलं आहे. हे खरेदी करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख उघड केलेली नाही.
ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या सायमन बार्नेट या व्यक्तीने हे घड्याळ १९६३ मध्ये विकत घेतले होते. सायमन हा रॉयल नेव्हीचा सर्च-रेस्क्यू गोताखोर होता. २०१९ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर, घड्याळाचा वारसा त्याचा मुलगा पीटर बार्नेटला मिळाला. पीटर पोलिस सेवेतून निवृत्त झाला आहे. हे महागड अँटिक घड्याळ घालून फिरणे त्याला अस्वस्थ करत होते. तसेच ते सांभाळण्यासाठी तो सक्षम नव्हता. त्यामुळे त्याने के लिलावात विकण्याचा निर्णय घेतला.
पीटरच्या वडिलांनी हे घड्याळ (963 Rolex Submariner Watch) 70 पौंडांना म्हणजे सुमारे ७ हजार रुपयांना विकत घेतले होते. पण आता त्याची विक्री जवळपास ४१ लाखांना झाली आहे. हे घड्याळ लिलावात विकल्यानंतर पीटर म्हणाला, या घड्याळाशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहे. ते विकणे हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. पण एवढे महागडे घड्याळ घालून कुठेही जाता येत नव्हते. त्यामुळे घड्याळ विकले, तर घड्याळ विकून मिळालेल्या पैशांमुळे सध्या पीटर खूप खूश आहे. दरम्यान, असे सांगण्यात आले की, पीटरच्या वडिलांनी या घड्याळ्याचा वापर समुद्रातील बचाव मोहिमेसाठी केला होता. शिवाय ही रोलेक्स घड्याळे फक्त श्रीमंत लोकच वापरतात.