आपण सर्व सामान्य लोक रोज सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करतो. पण एखाद्या क्रिकेटर किंवा सेलिब्रिटीला बसने प्रवास करताना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. सध्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा बस प्रवास करतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. फोटो पाहून सर्वजण अनिल कुंबळे यांच्या साधेपणाचे कौतूक करत आहे.
झाले असे की, सोमवारी बंगळुरूमध्ये वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे सामान्य जनतेलाच नव्हे तर दिग्गज क्रिकेटर यांची देखील गैरसोय होत आहे. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेलाही यांना ही या संपामुळेमुळे अडचणींचा सामना करावा लागला. कुंबळे यांना घरी जाण्यासाठी विमानतळावरून चक्क सार्वजनिक बसने प्रवास करावा लागला. कुंबळे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या फोटोत तो विमानतळावरून सार्वजनिक वाहतुकीने म्हणजेच BMTC बसने घरी जाताना दिसत आहे.
अनिल कुंबळे यांनी केला सार्वजनिक बसने प्रवास
एकेकाळी भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले ५२ वर्षीय कुंबळे बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) च्या बसद्वारे विमानतळावरून बनशंकरी भागातील त्याच्या घरी गेले. त्यांनी स्वत: ट्विटरवर सेल्फी शेअर केला आहे. बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) द्वारे चालवलेल्या वायु वज्र बसमध्ये ते उभे असल्याचे दिसत आहे. कारण केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपामुळे कॅब उपलब्ध नव्हती. इतर प्रवाशांनी कुंबळे यांना ओळखले नाही.
हेही वाचा – ”चॉकलेट परत दे!”, सही दिल्यानंतर धोनीने चाहत्याकडे मागितले चॉकलेट; व्हायरल होतोय मजेशीर व्हिडीओ
व्हायरल होतोय फोटो
“BMTCच्या बसने आज विमानतळावरून घरी परतलो,” असे कुंबळेने पोस्टसोबत लिहिले. त्याची पोस्ट लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली. या पोस्टला आतापर्यंत सुमारे पाच लाख व्ह्यूज आणि हजारो लोकांनी लाईक केले आहे. हा फोटो पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, कुंबळेच्या साधेपणाने नेटिझन्स प्रभावित झाले आहेत. यातील काही चाहत्यांनी कुंबळेचे कौतुक केले आहे.
नेटकऱ्यांनी केले कौतूक
“बंगलोरमधील ते चांगले जुने दिवस,” एकाने लिहिले. “विमानतळावर जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे BMTC!” दुसरा म्हणाला. “इतकं साधं आणि डाउन टू अर्थ कुंबळे सर,” तिसऱ्याने लिहिले. “लोक BMTC बसेसना क्रेडिट देत नाहीत कारण ती भारतातील सर्वोत्तम बसेसपैकी एक आहे,” असे दुसर्या व्यक्तीने पोस्ट केले.
बंगळुरूमध्ये वाहतूक संघटनांचा संप
वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे बंगळुरूमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. विमानतळावरील टॅक्सी चालकांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे सरकारने विमानतळावर इंदिरा कँटीन उभारावे आणि “एक विमानतळ एक भाडे” मॉडेल लागू करावे. विमानतळावर ये-जा करण्यासाठी एकच दर. संपाचा प्रभाव कमी करण्यासाठी BMTC ने विमानतळावर अतिरिक्त १०० ट्रिप चालवल्या.
हेही वाचा – पाणी नव्हे, रस्त्यावरून वाहतेय चक्क Red Wine; व्हायरल व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही
१३२ कसोटी आणि २७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर कुंबळेने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट लेग स्पिन गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, त्याने कसोटीत ६१९ विकेट घेतल्या आहेत.