Lioness Attack on Baby Zebra: जंगलाच्या जगात दररोज आपल्याला मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे केवळ पाहिले जात नाहीत तर ते प्रचंड शेअरदेखील केले जातात. जंगलातील व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करतात, कारण येथे अनेक वेळा अशा गोष्टी दिसतात ज्याची कोणीही अपेक्षा केली नसेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जिथे एका सिंहिणीला झेब्राच्या बाळाची त्याच्या आईसमोर शिकार करायची होती, पण इथे सिंहिणीला आईच्या ताकदीसमोर शरणागती पत्करावी लागलीये. हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

वन्य प्राण्यांमधील जबरदस्त झुंज पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यात काही वन्यप्राणी फोटॉग्राफर नेहमीच असे काही क्षण टिपण्यासाठी तत्पर असतात, जे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. आजकाल नेटकरी वन्यजीव प्राण्यांच्या साहसी व्हिडीओंमध्ये अधिक रस घेताना दिसून येतात. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये झेब्राच्या पिल्लाची शिकार करताना सिंहिणीचा डाव चांगलाच फसल्याचं पाहायला मिळत आहे.

असे म्हटले जाते की आई आपल्या मुलांसाठी यमराजाशी लढू शकते. हा नियम केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही तितकाच लागू होतो, आता हा व्हिडीओ पाहा, जिथे सिंहिणीला झेब्राच्या पिल्लाची शिकार करायची होती, परंतु येथे आईने पुढाकार घेतला आणि सिंहिणीपासून तिच्या पिल्लाचा जीव वाचवलाच नाही तर सिंहिणीला असा धडाही शिकवला की आता पुढच्या वेळी शिकार करण्यापूर्वी सिंहिण नक्कीच शंभर वेळा विचार करेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सिंहिण संधी मिळताच झेब्राच्या कळपावर हल्ला करते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सिंहिणीचे संपूर्ण लक्ष फक्त शिकारीवर असते, कारण ती तिच्यासाठी एक सोपी शिकार आहे. अशा परिस्थितीत आई सिंहिणीचा हेतू ओळखते आणि धावू लागते, ती तिच्या बाळाच्या मागे सावलीसारखी धावू लागते. आता सिंहिण तिच्या बाळावर हल्ला करण्याचा विचार करताच, आई तिला जोरात लाथ मारते, ज्यामुळे सिंहिणीला चांगलाच धक्का बसतो.

येथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Nature Is Metal (@natureismetal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर natureismetal नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “जगातील कोणतीही शक्ती आईसमोर उभी नाही.” त्याच वेळी दुसऱ्याने लिहिले की, “आता सिंहिण आईसमोर तिच्या बाळाची शिकार करणार नाही.” याशिवाय इतर अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.