अभिनेत्री अंकिता लोखंडेने मुंबईत तिचा प्रियकर विकी जैनसोबत अधिकृतपणे साखरपुडा केली. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत.अंकिता लोखंडेने तिच्या पार्टीसाठी, मॅचिंग कानातल्यांसह चमकदार काळा ड्रेस परिधान केला होता तर विकीने ब्लॅक टर्टलनेक टी-शर्ट आणि मॅचिंग पॅंटवर बेज प्रिंटेड जॅकेट घातले होते.

साखरपुड्यासाठी निवडलं खास गाणं

जेव्हा या जोडप्याने अंगठ्यांची देवाणघेवाण केली तेव्हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या राबता चित्रपटातील टायटल ट्रक पार्श्वभूमीवर वाजत होते. अंकिताने एली गोल्डिंगच्या लव्ह मी लाइक यू डू वरही परफॉर्म केले. गाणे चालू असताना तिच्या ड्रेसचे रंग बदलत राहिले.

विकीने अंकिताच्या बोटात अंगठी घातल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांनी नंतर स्टेजवर उभे राहून प्रेक्षकांना त्यांच्या अंगठ्या दाखवल्या.

( हे ही वाचा: डीजेचा आवाज ऐकून नवरदेव झाला बेभान, वऱ्हाडी मंडळी बघतच बसले; बघा Viral Video )

( हे ही वाचा: लहान मुलगी खेळतेय अवाढव्य सापाशी; हा Viral Video एकदा बघाच! )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता म्हणाली, “मी त्याला माझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी खूप भाग्यवान आहे की विकी माझ्या आयुष्यात आला आहे. मला वाटतं की विक्कीमुळे माझं आयुष्य खूप सोपं आहे. मी देवाची खरोखर आभारी आहे की तो माझा सदैव भागीदार आहे.”