Emotional video: घरापासून दूर सीमेवर देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून दूर जावे लागते. मात्र सुट्टीसाठी घरी आल्यावर त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावत नाही. सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये लष्करातील एक जवान आपल्या आईला असे सरप्राईज देतो की, ते पाहून आईला धक्काच बसतो. लेकाला पाहिल्यानंतर आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत.

आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा सीमेवरून रजा घेऊन घरी परतत असल्याचे दिसत आहे. तो त्याच्या आईला सरप्राईज देतो आणि तिला मागून मिठी मारतो. सुरुवातीला आई घाबरते, पण नंतर जेव्हा तिने आपल्या मुलाचा चेहरा दिसतो तेव्हा ती त्याला मिठी मारते आणि खूप रडते. हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. हा व्हिडिओ एक्सवर @Gulzar_sahab नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ १८ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आज फिर जीने की तमन्ना हैं.., विश्वास नांगरे पाटलांनी लुटला पोहण्याचा आनंद; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

व्हिडिओवर यूजर्सनी अशी दिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “इंटरनेटवरील आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ.” आणखी एका युजरने लिहिले की, हृदय जिंकणारा व्हिडिओ. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हे पाहून मी भावूक झालो…”