तेलंगणाच्या नालगोंडा पोलिसांनी पोलिस हेल्पलाइन नंबर, १०० वर वारंवार कॉल केल्याबद्दल एका व्यक्तीला अटक केली. नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती, त्याने रात्रीच्या जेवणात आपल्या आवडत्या मटण करी न बनवल्याबद्दल त्याच्या पत्नीवर रागावत पोलिसांना कॉल केले. १८ मार्च, शुक्रवारी रात्री आपल्या पत्नीने मटण करी शिजवली नाही म्हणून नवीनला राग आला. वाद झाल्यानंतर त्याने १०० नंबर डायल करून पोलिसांना फोन केला.
सुरुवातीला, जेव्हा नवीनने पोलिस नियंत्रण कक्षाचा नंबर डायल केला आणि घटनेचे वर्णन केले आणि त्याच्या पत्नीविरुद्ध ‘तक्रार’ केली, तेव्हा ऑपरेटरने तो दारूच्या नशेत कॉल असल्याचे समजले. मात्र, सतत सहा कॉल आल्यानंतर ऑन ड्युटी पोलिसांनी वरिष्ठांना इशारा दिला. नवीनच्या घरी गस्तीची गाडी पाठवण्यात आली होती, पण तो बिघडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला झोपण्यासाठी घरी सोडले.
(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)
पुढच्या दिवशी शनिवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा कनगल मंडळातील चेर्ला गौराराम गावात त्याचा दरवाजा ठोठावला आणि नवीनला ताब्यात घेतले. नवीनवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम २९० (सार्वजनिक उपद्रवासाठी शिक्षा) आणि ५१० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.