जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेलं आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन १९ मार्चपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. हे गार्डन १५ हेक्टर क्षेत्रात पसरलं आहे.या गार्डनमध्ये जवळजवळ ६८ जातींची 15 लाख ट्यूलिप आहेत. दल लेक आणि झबरवान टेकडीच्या पायथ्याशी असलेले आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन ही श्रीनगरमधील दोन ठिकाणं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत या दोन्ही ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
१६ लाखाहून अधिक फुलांनी खुलली बाग
पूर्वी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये टय़ूलिप गार्डन सुरू केले होते. दहा वर्षांत आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचा मान या गार्डनला मिळाला.काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं ट्यूलिप गार्डन खूप महत्त्वाचे आहे. दरवर्षी लाखो लोक देशभरातूनच नाही तर परदेशातूनही पृथ्वीवरील हे नंदनवन पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतात.जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी यावर्षी गार्डनचे उद्घाटन केले.उद्घाटनच्या कार्यक्रमाला परदेशातील देखील पर्यटत उपस्थित होते. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते.
हेही वाचा – गोष्ट एका Part-Time युट्युबरची; ज्यूस विकून चालवतो युट्युब चॅनेल, प्रमोशनसाठी अनोखा जुगाड
ट्युलिप गार्डनमध्ये यंदा 68 प्रकारच्या ट्युलिप्सची लागवड करण्यात आली आहेत. त्यापैकी चार नव्या जातीचे ट्यूलिप्स नेदरलँड येथून आणण्यात आले आहे. ट्युलिपची फुले सरासरी तीन ते चार आठवडे टिकतात.परंतु मुसळधार पाऊस किंवा जास्त उष्णतेमुळे ती नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येते.