Wedding Dance Video : सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ खूप पसंत केले जातात. लग्नात अनेक रंग पाहायला मिळतात. आनंद, मजा, भावना आणि कधीकधी काही मजेदार गोष्टी घडतात. त्यामुळेच चाहतेही या क्षणांचा भरपूर आनंद घेतात. भारतीय विवाहसोहळ्यांचे मजेदार आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ दररोज व्हायरल (viral video) होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media) होत आहे, ज्यामध्ये बाप-लेकीची जोडी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी नववधू असून ती तिच्या वडिलांसोबत नाचत आहे.
व्हिडीओमध्ये वधू आणि तिच्या वडिलांनी जस्टिन बीबरच्या बेबी आणि नोरा फतेहीच्या ओ साकी साकीसारख्या गाण्यांवर डान्स केरताना दिसत आहे. दोघेही ट्रेंड डान्सर्सप्रमाणे नाचत आहेत. पाहुणेही टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात. दोघेही पूर्ण उर्जेने डान्स करताना दिसत आहेत. वधूने ऑफ-व्हाइट एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा घातला आहे, तर तिच्या वडिलांनी काळ्या रंगाचा टक्सिडो घातला आहे.
(हे ही वाचा: Kshama Bindu Sologamy: अखेर नवरदेवाशिवाय पार पडलं लग्न! सप्तपदी घेत बांधली स्वतःशीच लग्नगाठ)
(हे ही वाचा: ‘या’ Optical Illusion फोटोत लपलेत आहेत दोन वाघ; दुसरा तुम्ही शोधू शकता?)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ अनिशाच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला आहे, जी लॉस एंजेलिसची नर्तक आणि ऑर्थोडॉन्टिस्ट आहे. या व्हिडीओचे कॅप्शन लिहिले आहे, “@norafatehi तो तुमची जागा घेण्यासाठी येत आहे.” व्हिडी ओमध्ये दिसत आहे की वधूचे तिच्या वडिलांसोबत खूप चांगले बाँडिंग आहे, कारण दोघेही एकत्र नाचताना दिसत आहेत. दोघांचे डान्स व्हिडीओ यूजर्सना खूप पसंत करत आहेत. यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत, तर कमेंट सेक्शन प्रेम आणि हृदयाच्या इमोजींनी भरलेला आहे.