Emotional Instagram Reels: माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या दु:खात साथ देणं, ओळख नसतानाही मदतीला धावणं. माणुसकीला धर्म, जाती, वय किंवा ओळख कशाचेही बंधन नसते, एखाद्याला मदत करण्याची भावना जी प्रत्येकाच्या अंतःकरणातून येते. आजच्या धावपळीच्या, मोबाईलच्या जगात माणूस दिवसेंदिवस स्वार्थी होत चालला आहे. लोक फक्त स्वतःचा विचार करतात. कोणाला इतरांच दुःख जाणून घेण्याची किंवा गरजूला मदत करण्याची देखील संवेदना उरलेली दिसत नाही. हे सत्य आहे ती माणसातील माणुसकी हरवते चालली आहे. पण अजूनही जगात काही लोक आहेत जे माणूसकी जिवंत ठेवत आहेत. विशेष म्हणजे एका चिमुकलीने माणुसकी जिवंत ठेवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रसुतीकळांनी तडफडत असलेल्या महिलेच्या मदतीला ही चिमुकली धावून आली आहे. व्हि़डीओने अनेकांचे मन जिंकले आहे तर अनेकजण चिमुकलीच्या कृतीचे कौतुक करत आहेत.

मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलीची कृती माणुसकी अजूनही जिवंत आहे हे दर्शवते. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की,गर्भवती महिला प्रसूती वेदना झाल्यानंतर रुग्णालयात जात होती, परंतु वाटेत अचानक गाडीचे एक चाक निसटले. चिमुकली धावतच महिलेच्या मदतीसाठी आहे.

अनोळखी चिमुकलीच्या मदतीने वाचली महिला (Unknown Girl’s Courage Helped Pregnant Woman)

गर्भवती महिलेला घेऊन हॉस्पिटलला निघालेल्या रिक्षाचा अपघात झाल्याने रिक्षाचं चाक निसटलं. दरम्यान गर्भवती महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. रिक्षाचालक येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत मागत होता पण कोणीही थांबत नव्हते. तेवढ्यात ए
एक कार तिथे थांबते आणि शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी बाहेर पडते. धावतच चिमुकली रिक्षाजवळ येते. रिक्षामध्ये गर्भवती महिलेची अवस्था पाहून ती कारकडे धावत जाते आणि पाण्याची बाटली घेऊन येते आणि महिलेला देते. महिलेने पाणी प्यायल्यानंतर कारमध्ये जाऊन चिमुकली मदतीसाठी तिच्या वडीलांना बोलावते. रिक्षाचालकही कारजवळ जाऊन मदत मागत असल्याचे दिसते. चिमुकलीचे वडील गर्भवती महिलेला उचलून कारमध्ये ठेवतात आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. संकटात सापडलेल्या व्यक्तीची मदत करण्याऱ्या चिमुकलीने नेटकऱ्यांची मनं जिंकले आहेत.

व्हायरल व्हिडिओ येथे पहा –

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव (Netizens Shower Praise)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. वापरकर्त्यांनी व्हिडिओवर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “एवढ्या लहान वयात अशी समजूतदारपणा आणि संवेदनशीलता खरोखरच कौतुकास्पद आहे.” दुसऱ्याने म्हटले, “मुलींकडे लहानपणापासूनच मातृत्व असते. हा व्हिडिओ ते सिद्ध करतो.” हे दृश्य पाहून डोळ्यात पाणी आल्याचे अनेकांनी सांगितले.

व्हिडिओ असा संदेश देखील देतो की, माणुसकीला वयाचे बंधन नसते! कधीकधी एक छोटीशी कृती देखील जीव वाचवू शकते किंवा वेदना कमी करू शकते. या मुलीने जे केले ते समाजासाठी एक शक्तिशाली धडा आहे की,”संवेदनशीलता आणि करुणा ही मानवतेचे सर्वात मोठे रूप आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन लाखोंपेक्षा पाहिला गेला आहे आणि त्याला “मानवतेचे खरे उदाहरण” म्हटले जात आहे.