Ayodhya Deepotsav Viral Video : नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, असे म्हणतात. तसेच काहीसे सणवार एकासाठी आनंद, तर दुसऱ्यासाठी पोटापाण्याचा खर्च भागवण्यासाठीचे साधन होऊन जातात. असेच काहीसे दृश्य व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी अयोध्येत २५ लाख १२ हजार ५८५ दिवे लावण्यात आले होते. तर या वर्षी दीपोत्सवात २६.१७ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. पण, दीपोत्सव झाल्यानंतर जे दृश्य बघायला मिळाले, त्यामुळे तुमच्याही डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येकासाठी दिवाळी सारखी नसते, असे म्हणतात. दीपोत्सवासाठी अयोध्येत ठिकठिकाणी दिवे लावण्यात आले होते. पण, हे दिवे जेव्हा विझले तेव्हा मग काही माणसांची खरी दिवाळी सुरू झाली. दिवे विझल्यानंतर अयोध्येतील काही गरीब माणसे दिव्यातील तेल बाटलीत भरून घेऊन जाताना दिसली. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळीच मंडळी प्रत्येक दिव्यातील एकेक थेंबही काळजीपूर्वक बाटलीत भरून घेऊन जाताना दिसली आहेत; जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
यापेक्षा सुंदर काय असू शकतं… (Viral Video)
व्हायरल व्हिडीओच्या दोन बाजू आहेत. एकीकडे आपल्याकडे जे आहे ते मिळवण्यासाठीसुद्धा त्या गरिबांना केवढे कष्ट करावे लागत आहेत. तर, दुसरी सकारात्मक बाजू पाहिली, तर या लाखोंच्या संख्येत लावलेल्या दिव्यांमधील तेलाचाही त्यांना नकळत उपयोग झाला आहे. एका क्षणासाठी तुम्हाला हे दृश्य पाहून डोळ्यांत पाणी येईल; तर दुसरीकडे याच दिव्यांमुळे त्यांना मदतही होते आहे, असा आनंदही मनाला देऊन जाईल. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kundanjwellstore या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होतं आणि तो विझल्यावर कुणाचं पोट भरतं. यापेक्षा सुंदर काय असू शकतं’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिलेली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून “छान आहे ना. भक्त (पणत्या) दिवे लावून आनंद मिळवतात आणि गरीब मुले त्या पणतीतील तेल गोळा करून. शेवटी देव प्रत्येक थेंबाला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवतो”, “यामध्ये काहीच वाईट नाही” अशा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.