बाबा रामदेव यांच्या पतंजलीने पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले आहे. या क्रेडिट कार्डद्वारे पतंजली आणि पंजाब नॅशनल बँक संयुक्तपणे ग्राहकांना तीन प्रकारचे फायदे देत आहेत. क्रेडिट कार्डने उत्पादनांच्या खरेदीवर ५ ते १० टक्क्यांची सूट दिली जाईल. त्याचबरोबर या कार्डवर पाच लाखांपर्यंतचा अपघाती विमा संरक्षण आणि इतर सुविधाही दिल्या जात आहेत. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, “आमचा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या स्वप्नाशी सुसंगत आहे. हे क्रेडिट कार्ड कमी उत्पन्न असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करेल.” क्रेडिट कार्ड लाँच करताना आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, “या कार्डच्या माध्यमातून केवळ पतंजलीच नाही तर इतर ब्रँडवरही सूट मिळणार आहे.”

क्रेडिट कार्डसह कमाल मर्यादा १० लाख रुपये असेल. तर क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर पेमेंट करण्यासाठी ४९ दिवसांचा अवधी दिला जाईल. त्याच वेळी, या क्रेडिट कार्डवर पाच लाखांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण सर्व ग्राहकांना दिले जाईल. पतंजली आउटलेटवरून क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ ते १० टक्के सूट मिळेल. क्रेडिट कार्ड लाँच करताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारता’साठी मोठे बूस्टर ठरेल. आम्ही या कार्डचा लाभ एक कोटी लोकांपर्यंत पोहोचवू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतंजली-पीएनबी क्रेडिट कार्डचे दोन प्रकार आहेत. पीएनबी रुपे प्लाटिनम आणि दुसरा प्रकार पीएनबी रुपे सिलेक्ट असे दोन प्रकार आहेत. पीएनबी रुपे प्लॅटिनम कार्ड घेण्यासाठी कोणतेही शुल्क नसेल तर वार्षिक शुल्क ५०० रुपये असेल. पीएनबी रुपे सिलेक्ट घेण्यासाठी ५०० रुपये, तर वार्षिक फी रु ७५० असेल. पतंजली स्टोअर्स आणि पीएनबी शाखांना भेट देऊन ही दोन्ही क्रेडिट कार्ड घेता येतील.