Elephant Video: प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे लोकांना प्रचंड आवडतात. सध्या सोशल मीडियावर हत्ती आणि बकरीचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होतोय. यामध्ये हत्तीचे पिल्लू बकरीला पाहून घाबरते आणि कशाप्रकारे पळू लागते ते दाखवण्यात आलंय. त्याचप्रमाणे हत्तीच्या पिल्लाला शेळीने ज्या पद्धतीने घाबरवले ते देखील पाहण्यासारखे आहे.

बकरीने चक्क हत्तीला घाबवलं..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हत्ती आणि त्याचे पिल्लू जंगलात फिरताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला एक बकरीही बांधलेली दिसत आहे. हत्तीचे पिल्लू हळूहळू आपल्या आईकडे जाताना दिसत आहे. तितक्यात त्या पिल्लाला बाजूला असलेली बकरी दिसते. बकरीला पाहताच हत्ती घाबरतो आणि पळत सुटतो. हत्ती पळत आपल्या आईकडे जातो. मात्र हत्ती बकरीला बघून नक्की का घाबरला हे मात्र कळल नाही. बकरीने देखील हत्तीला ज्या पद्धतीने घाबरवले ते एकदा पाहाच..

‘हा’ गोंडस व्हिडिओ येथे पाहा..

( हे ही वाचा: नवरीला उचलून नेताना नवऱ्याचा पाय घसरला अन्…; ‘त्या’ कृतीमुळे नेटकरी करतायत कौतुक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ज्या प्रकारचं दृश्य आपण पाहतोय ते क्वचितच पाहायला मिळतं. कारण हत्ती हा असा प्राणी आहे की त्याच्याशी पंगा घ्यायला कोणीही जात नाही, मग तो सिंह असला तरी. हा व्हिडीओ elephantsofworld नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.