बकरी ईदसाठी मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने बोकड खरेदी करतात. मग त्यात वेगळ्या रंगाचे जर बोकड मिळाले तर त्यासाठी लाखोंची किंमत मोजली जाते. बकरी ईद म्हटलं की देशभरामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या बोकडांची चर्चा रंगते. कोणाच्या पाठीवर चंद्र असतो, तर कोणाच्या डोक्यावर चंद्र असतो. यामुळे बोकडांना बाजारात मोठी मागणी असते. अशा प्रकारचे बोकड हे लाखो रुपयांना विकले जातात.दरम्यान अशाच एका हल्ला नावाच्या बकऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे या बकऱ्याची किंमत…या बकऱ्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल..याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून सर्वच शॉक झाले आहेत.

आज देशभरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. सोबतच या दिवशी इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम समाजात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. ज्याला बकरी ईद म्हणतात.

तब्बल ५१ लाख ७६८ रुपयाचा बकरा

अशाच एका विक्रीसाठी आसणाऱ्या बकऱ्याची सध्या चर्चा रंगली आहे. कारण त्याची किंमत आहे तब्बल ५१ लाख रुपये. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बाजारात हा बकरा ठेवला असून त्या जागेत बकऱ्याच्या विक्रीसाठी त्याचं बॅनरही लावलं आहे. या बॅनरवरल बकऱ्याचं नाव हल्ला असं लिहलं असून त्याखाली त्याची किंमतही लिहली आहे. हे पाहून एक तरुण तिथे जातो आणि मालकाला बकऱ्याची किंमत विचारतो यावर मालक या बकऱ्याची किंमत ५१ लाख ७६८ रुपये इतकी सांगतो. यावर पुढे ज्याला घ्यायचं असेल त्याला थोडे कमी जास्त पैसे करू असंही ते सांगत आहेत. या व्हिडीओमध्ये तो बकरामही दिसत आहे, काळ्या रंगाचा हा बकरा असून त्याच्या गळ्या सोन्याची साखळी दिसत आहे.

बकऱ्याच्या एवढ्या किंमतीमागचं कारण काय?

मात्र या बकऱ्याची एवढि किमंत का असा प्रश्न तुम्हालाही पडला असले. तर त्याचं कारण असं की बकऱ्याच्या अंगावर अल्हा असं दिसत आहे. संपूर्ण काळ्या रंगाचा हा बकरा असून त्याच्या पोटावर फक्च पांढऱ्या रंगाचं अल्हा असं दिसत आहे. त्यामुळे या बकऱ्याची एवढी किंमत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mehfuz_3122 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.