Bank Holiday Today: दिवाळी अमावस्या, गोवर्धन पूजेच्या मोक्यावर आज, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी बँकांना सुट्टी आहे. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकने ही आजच्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. सर्व राज्यांमध्ये स्थानिक सणासुदीच्या कारणामुळे सरकारी सुट्टी वेगवेगळ्या दिवशी दिली होती. त्यामुळेच कोणत्या राज्यात नेमकी कधी सुट्टी आहे यामुळे बँकांच्या सुट्टीबाबत गोंधळ होऊ शकतो. तेव्हा तुमच्या शहरात बँक बंद आहेत की चालू हे जाणून घ्या आणि मगच बाहेर पडा अन्यथा तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाईल.

महाराष्ट्रातील बँकांना आज २१ ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी बालिप्रतिपदा पाडवा आहे. त्या दिवशी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. या सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग व्यवहारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील बँका बंद असणार आहेत.

आज लक्ष्मी पूजनाच्या मोक्यावर मुंबई, नागपूर, भोपाल, बेलापूर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाल, जम्मू, रायपूर आणि श्रीनगर या ठिकाणी बँकांना सुट्टी आहे.

२३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आणि इतर स्थानिक सणांमुळे गुजरात, सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बँका बंद असतील. त्या दिवशी महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी नाही. या सर्व सुट्ट्यांदरम्यान ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम सेवा पूर्णपूणे सुरू राहतील.

ऑनलाइन आणि नेट बँकिंग सुरू

काही ठिकाणी बँकांना सुट्टी असली तरी देशभरात अनेक ऑनलाइन सुविधांचा वापर तुम्ही करू शकता. यामध्ये नेट बँकिंग तसंच यूपीआय पेमेंटचाही समावेश आहे.

आज बँकांना सुट्टी असली तरी तुम्ही यूपीआयचा वापर करू शकता. यूपीआयच्या मदतीने तुम्ही पैसे पाठवणे आणि घेणे असे दोन्ही व्यवहार करू शकता. तसंच बिल पेमेंटही करू शकता.

नेट बँकिंगच्या सुविधांचा वापरही सुट्टीच्या अडथळ्याविना तुम्हाला करता येऊ शकतो.