Blogger Mixes Chilli Flakes With Lip Gloss: सोशल मीडियावर आजकाल प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते मग ते विचित्र, मजेशीर व्हिडिओ असो, फूडचे व्हिडिओ असो की ब्युटी आणि स्किन केअरचे व्हिडिओ असो. आता स्किन केअर व्हिडिओबाबत सांगायचे झाले तर यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ त्वचेची काळजी कशी घ्यावी हे सांगतात, काही व्हिडिओमध्ये मेकअप कसा करावा हे सांगतात, काही व्हिडिओमध्ये मेकअपच्या नवनवीन पर्यायांबाबत माहिती दिली जाते. काही व्हिडिओ खरचं माहिती देणारे असतात पण काही व्हिडिओ मात्र विनोदी ठरतात. कारण लोक व्हिडिओच्या नावाखाली काहीच्या काही प्रयोग करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार एका व्हिडिओतून समोर आला आहे जो पाहून सोशल मीडियावरील प्रत्येकजण आश्चर्यचकीत होत आहे. या व्हिडोमध्ये ब्युटी ब्लॉगर चिली फ्लेक्स म्हणजेच लाल मिर्ची पावडर तयार करताना दिसत आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. चला जाणून घेऊया सविस्तर

मेकअपचा केला कचरा

व्हिडिओच्या सुरूवातीला ब्लॉगर जान्हवी सिंह मेकअप पॅलैटवर काही लिप ग्लॉस काढताना दिसत आहे. त्यानंतर ती चिली फ्लेक्स म्हणजेच लाल मिर्ची पावडर एक छोटा पॅकेट घेते आणि तो लिप ग्लॉसमध्ये टाकते आणि तो आपल्या ओठांवर लावते. थोड्यावेळाने, हा परिणामा दाखविताना ती हा लिपग्लॉस ओठांवरून पुसून काढते. तिची प्रतिक्रिया पाहून असे दिसते की ब्युटी ब्लॉगरचा हा प्रयोग तिलाचा महागात पडला आहे. त्यामुळेच तिने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, व्हायरल चिली लिप ग्लॉस….पुन्हा कधीच वापरणार नाही.

हेही वाचा – सिधी बात, नो बकवास! ‘कामात मजा येईना’ म्हणत पठ्याने सोडली नोकरी, हर्ष गोयंका म्हणाले, ”ही तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

इंस्टाग्रामवर लोकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की,”प्लिज हा ट्रेंड सुरू करू नका”, तर आणखी एकाने म्हटले की,”आयशॅडो तयार केले असते याचे” तर दुसऱ्याने लिहिले की, म्हणजे कोणालाही इतका फालतूपणा करायाची काय गरज आहे, फक्त एक लिप बाम वापरा झाले काम. तर तिसऱ्याने म्हटले आहे की, ”या जगात काय सुरू आहे” तर चौथ्याने म्हटले, ”हा काय मूर्खपणा आहे”