Bengaluru Auto Driver Slaps Woman Video Viral : महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणारी एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे. या घटनेत ऑटो राइड कॅन्सल केल्याच्या रागातून रिक्षाचालकाने भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन केले. त्यानंतर वाद घालत त्याने तरुणीच्या चक्क कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही घटना बेंगळुरूमधील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये दिसतेय की, ऑटो राइड कॅन्सल केल्याने संतापलेल्या रिक्षाचालकाने आधी तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. पुढे तो वरचढ आवाजात तिच्याशी अर्वाच्च भाषेत बोलत शिवीगाळ करीत जोरजोरात भांडू लागला. घटनेवेळी या तरुणीबरोबर तिची एक मैत्रीणसुद्धा होती. यावेळी त्या तरुणीने चालकाचे असे हे वर्तन आपल्या मोबाईल व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले, ज्यानंतर तिने तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो हजारो लोकांनी पाहिला, ज्यानंतर बेंगळुरू पोलिसांकडे रिक्षाचालकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

“गॅस तुझा बाप देतो काय?” ऑटो चालकाची दादागिरी

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑटो राइड कॅन्सल करून दुसऱ्या ऑटोमध्ये बसलेल्या तरुणीशी रिक्षाचालक मोठ्या आवाजात बोलत आहे. यावेळी ती तरुणी त्याला विचारते की, तुम्ही एवढं ओरडून का बोलत आहात? त्यावर ऑटोचालक रागाने म्हणतो, “गॅस तुझा बाप देतो का?” ज्यावर एक तरुणी उत्तर देत म्हणते की, तुम्ही जर असंच गैरवर्तन करीत राहिलात तर आम्ही पोलिसांत तक्रार करू.

Read More News : क्षणात हसतं खेळतं कुटुंब उदध्वस्त! भरधाव कार भिंत तोडून थेट घुसली घरात अन्…, पाहा धडकी भरवणारा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑटो कॅन्सल केल्याच्या रागातून चालकाने तरुणीच्या मारली कानाखाली

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीशी अर्वाच्च भाषेत बोलल्यानंतर त्या पोलिसांत तक्रार करू, असे म्हणताच रिक्षाचालकही कारवाईला न घाबरता, त्यावर तो “चल, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार कर”, असे सांगतो. त्यानंतर ती तरुणी पुढे, “राईड रद्द करून मी काय एवढी मोठी चूक केलीय. तुम्ही आमची राइड रद्द करीत नाही काय”, असा प्रश्न विचारते. त्यावर भडकून रिक्षाचालक थेट तरुणीच्या कानाखाली लगावतो. या घटनेनंतर संतापलेली तरुणी कानाखाली का मारली, असे विचारते. पण, चालक भडकून तिच्याशी उलट भांडू लागतो. त्यानंतर काही वेळातच तेथे लोकांची गर्दी जमा होते. नंतर तो रिक्षाचालक तिथून निघून जातो. ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, अनेकांनी त्या रिक्षाचालकावर अटक करून, कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.