भारतासह जगात दररोज रस्त्यांवर शेकडो अपघात होत असतात. यातील काही अपघात नकळत घडतात, तर काही अपघातांना वाहनचालकच जबाबदार असतात. रस्त्यावर चालता चालता अपघात कधी, कुठे आणि कसे होतील हे कोणालाच माहीत नाही, महणूनच रस्त्यावरून चालताना आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडीओ रोज शेअर होत असले तरी हे भीषण अपघात पाहिल्यानंतर माणसांची मने हादरून जातात, मात्र सध्या एका अपघाताचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अपघातात चूक नक्की कोणाची ?
या व्हिडीओमध्ये एक मुलगा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे, तर दुसरा मुलगा सायकलवर बसून त्याच्याच नादात सायकल चालवताना दिसून येत आहे. रस्ता ओलांडणाऱ्या मुलाची नजर सायकलस्वाराच्या नजरेत पडताच, सायकल पाहून तो आपला वेग वाढवत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्याच्या प्रयत्नात अपयशी ठरतो आणि सायकल त्याला धडकते. शेवटच्या क्षणी तो धावला नसता तर हा अपघात झाला नसता.

आणखी वाचा : खतरनाक सापाला वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याने काही सेकंदात केलं कंट्रोल, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कंटेनरमधून थेट ट्रकच्या छतावर पोहोचली ही गाय, पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

IPS दिपांशू काबरा यांनी व्हिडीओ शेअर केला आहे
हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ‘कोणाची चूक?’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. अवघ्या ५ सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाइकही केले आहे. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण असा काही चमत्कार घडला की पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘चूक चालणाऱ्याची आहे, कारण तो रस्त्यावर आजुबाजुला बघून चालत नाही’. आणखी एका दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिलं की, दोष सायकल चालकाचा आहे. कारण त्याने ब्रेक लावला नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच विचार करा की या अपघातात चूक नक्की कोणाची होती?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bet you have never seen such a unique accident video prp
First published on: 07-02-2022 at 15:32 IST