सोशल मीडियावर विचित्र खाद्यपदार्थांच्या रेसिपीचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहेत. हा व्हिडीओ पाहून चहाप्रेमींना धक्का बसू शकतो. हा व्हिडीओमध्ये एका चहाची विचित्र रेसिपी दाखवली आहे जे पाहून नेटकरी संतापले आहे.
बंगालदेशमध्ये ढाका येथील एका व्हिडीओमुळे सर्वांना थक्क केले आहे. या व्हिडीओमध्ये चहाची रेसिपी दाखवली आहे ज्यामध्ये असे पदार्थ टाकले जात आहेत ज्याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल. नुकत्याच व्हायकर झालेल्या या व्हिडीओमध्ये एक चहाची रेसिपी दाखवली आहे ज्यामध्ये चक्क सफरचंद आणि कच्चे अंड टाकण्यात आले आहे. ही रेसिपी पाहून चहाप्रेमींच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
सुलताना कुकस् नावाच्या एका अकांऊटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला चहापावडर आणि साखर एका पॅनमध्ये टाकून भाजली जाते. त्यात संफरचंदचे तुकडे करून भाजले जाते. धुर येऊ लागल्यानंतर त्यात दुध टाकण्यात आले. त्यानंतर चहा उकळल्यानंतर त्यात कच्च अंडे फोडून टाकण्यात आले. नंतर त्यात विलायची आणि दालचिणी टाकली जाते. त्यानंतर हा चहा एका कपात गाळला जातो.
हेही वाचा – मंच्युरिअन खायला आवडतात का? मग एकदा हा व्हिडीओ बघाच! पुन्हा मंच्युरिअन खाण्यापूर्वी १०० वेळा कराल विचार
या व्हिडीओला अनेकांनी पाहिले आहे. याच चॅनलवर यापूर्वी फिश टी म्हणजेच माश्याचा चहाची रेसिपी पोस्ट केली होती तेव्हा चर्चेत आले होते. लोकांनी ही विचिक्ष रेसिपी पाहून धक्का बसला आहे तर चहा प्रेमींना व्हिडीओ पाहून राग अनावर होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर टिका केली आहे.
हेही वाचा – भाजीत चुकून तिखटं जास्त पडलं? टेन्शन घेऊ नका, झटपट वापरा हा सोपा उपाय
व्हिएतनाममध्ये प्रसिद्ध असलेली अंड्याच्या कॉफी प्रसिद्ध आहे. पण अंड्याचा चहा मात्र नवीनच रेसिपी आहे आणि ही कल्पना अत्यंत धक्कादायक आहे.