Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ बालपणीची आठवण करुन देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकले खेळभांडे खेळताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपणीचे मित्र मैत्रीणी आणि बालपण आठवू शकते.
बालपण म्हटलं की सर्वांचा आवडता खेळ म्हणजे भातुकलीचा खेळ. भातुकलीच्या खेळामध्ये मातीच्या खेळभांड्यांबरोबर आपल्यापैकी अनेक जण खेळले असेल. या व्हिडीओमध्ये सुद्धा काही लहान मुले भातुकलीचा खेळ खेळताना दिसत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे लहान मुले आणि मुली मातीच्या भांड्यांबरोबर खेळताना दिसत आहे. संसार थाटल्यानंतर जसे घरात भांडे असतात तसेच छोटी भांडे या व्हिडीओत दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Nagpur Tarri Pohe : नागपूरचे तर्री-पोहे! झणझणीत तर्री घातलेले पोहे कसे बनवले जातात, पाहा VIDEO
zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खरंच बालपण आठवले” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. एका युजरने लिहिलेय, “मातीत खेळून मोठा झालो. बालपणीचे किती गोड दिवस होते” तर एका युजरने लिहिलेय, “काही गोष्टी कधीच परत नाही पण मला खूप आठवण येते. बालपणीची गोष्टच वेगळी होती.” अनेक युजर्सनी लिहिलेय की ते सुद्धा त्यांच्या मित्र मैत्रीणींबरोबर असेच खेळायचे.”