सोशल मीडियावर अनेक जण रातोरात स्टार झाले आहेत. अगदी सामान्य व्यक्तीला सुद्धा ग्लॅमरचा टच देण्याचं काम इंस्टाग्राम रील, युट्युब शॉर्ट्सच्या माध्यमातून होत आहे. दरदिवशी नव्या रील स्टारचा व्हिडीओ व्हायरल होत असतो, मग तो कच्चा बदाम असो वा इंग्रजी गाण्यांना ढोल ताश्यांचा तडका देऊन केलेलं एखादं रिमिक्स. हा रीलचा ट्रेंड अनेकांनी इतका गांभीर्यांनी घेतला आहे, त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांमध्ये हजारो रुपये ही मंडळी गुंतवत असतात. याउलट काही जण कधी रस्त्यावर चार चौघात उभं राहून, कधी ट्रेन मध्ये, आपलं काम करताना फक्त कॅमेरा सुरु करून आपली कला दाखवतात व त्यातल्यात भाव खाऊन जातात. अशाच एक भेळपुरी विक्रेत्या सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि त्यांचं नाव आहे संगीता गायकवाड!

संगीता या लासूरच्या रहिवाशी असून त्याच भागातील व लगतच्या स्टेशनवर फिरत भेळपूरी विकतात. अनेकदा स्टेशनवर बसून तर कधी ट्रेनमध्ये भेळ विकताना समोर काकडी, कांदा, शेव- कुरमुरे, मसाले भरलेली मोठी परडी घेऊन त्या बॉलिवूड गाण्यांवर Lip Sync करत व्हिडीओ बनवतात. तुमचा आत्मविश्वास आम्हाला खुप आवडतो असे त्यांचे अनेक चाहते कमेंट करून सांगत असतात.

Video: आलियाच्या गाण्याला जर्मन तडका, पटाखा गुड्डी गाण्यावर तरुणींची धम्माल

अलीकडेच त्यांनी शेअर केलेल्या ये जो तेरे पायलों की छनछन है गाण्यावर शेअर केलेल्या व्हिडिओला ६५ लाख व्ह्यूज आहेत.

पहा या व्हिडिओची झलक

संगीता यांच्या हावभावांचे सर्वजण फॅन्स आहेत.

शिकण्यासारखं… हात नसतानाही तो करतोय वृक्ष लागवड; ‘हवा येऊ द्या’ फेम अरविंद जगताप Video शेअर करत म्हणाले..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगीता यांच्या अकाउंटला ४ लाख ७३ हजार हून अधिक फॉलोवर्स आहेत. त्यांच्या जवळपास प्रत्येक व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्यूज आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारी ही मेहनती माणसे सोशल मीडियातून घरोघरी पोहचली आहेत हे खरं, त्यांच्या कलेला व मेहनतीला सलाम!