सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मनोरंजक असतात, तर काही भावनिक व्हिडीओ असतात जे थेट आपल्या हृदयाला भिडतात. सध्या असाच एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील व्हिडीओतील मुलांची परिस्थिती पाहून वाईट वाटेल.

आपण कुटुंबीयांच्या किंवा मित्रांच्या वाढदिवशी महागडे केक ऑर्डर करतो, कापतो आणि केक अंगाला लावून वायादेखील घालवतो. पण तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर केक वाया घालवाताना विचार कराल. शिवाय आपण कुठेही फेकून देतो तो केक अनेकांच्या नशीबातही नसतो याची जाणीवही तुम्हाली होईल. मात्र, हा व्हिडीओ पैशाशिवायही आनंद साजरा करता येतो आणि प्रेमही व्यक्त करता येतं याचं एक जिवंत उदाहरण आहे.

केक म्हणून भाकरीवर लावली मेणबत्ती –

हेही पाहा- चक्क कोळ्याने केली सापाची शिकार, जाळ्यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी तडफडणाऱ्या सापाचा Video व्हायरल

व्हिडिओमध्ये दोन गरीब लहान मुलं दिसत आहेत. एका मुलाच्या हातात भाकरी दिसत असून त्या भाकरीवरच त्याने दोन मेणबत्या लावल्या आहेत. शिवाय त्या भाकरीकडे बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की, या मुलाने भाकरीलाट केकच्या आकारात आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय भाकरीच्या मध्यभागी काही पातळ पदार्थ ठेवल्याचंही दिसत आहे. व्हिडीओत काही वेळाने मोठा मुलगा, ‘हॅपी बर्थडे टू यू भाऊ’ व्हिडिओ पाहून अंदाज येतोय की, मोठा भाऊ लहान भावाचा वाढदिवस साजरा करत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन लहान भावांमधील प्रेम दिसून येत आहेच शिवाय अनेकजण हा व्हिडीओ पाहून खूप भावूक झाले आहेत.

हेही पाहा- २० रुपयांसाठी गरीब रिक्षावाल्याला भररस्त्यात केलं उभं; माणुसकीला काळीमा फासणारी घटना आली समोर

“हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Photo_gram143 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या दोन भावांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर लाखो लोकांनी तो लाईकही केला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे की, केकची नासाडी करणाऱ्यांनी हा व्हिडिओ जरुर पाहावा. तर आणखी एकाने लिहिलं की, ‘कदाचित मी त्यांनना भेटू शकलो असतो तर काही मदत केली असती, खरोखरच हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आहे.’ अनेक वापरकर्त्यांनी कमेंटमध्ये हा व्हिडीओ हृदयस्पर्शी असल्याचं म्हटलं आहे.