Nitish Kumar Rahul Gandhi Fact Check Photo : बिहारमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यंमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचारले असता त्यांनी दोन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील असे उत्तर दिले. त्यांनी मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी नितीश कुमार यांचे नाव घेतले नाही, त्यानंतर दोन्ही पक्षांमधील मतभेदांच्या बातम्या समोर येत आहेत. याचदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे लाइटहाऊस जर्नालिझमला आढळून आले. हा फोटो अलीकडील असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे, या फोटोवरुन आता बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार, बिहारमधील राजकीय समीकरण बदलणार अशा चर्चा रंगत आहेत. त्यामुळे आम्ही फोटो नेमका कधीचा आहे याचा शोध घेतला तेव्हा एक वेगळं सत्य समोरं आलं ते काय आहे जाणून घेऊ..

काय होत आहे व्हायरल?

I.N.D.I.A. गठबन्धन नावाच्या एक्स युजरने व्हायरल दाव्यासह फोटो शेअर केला आहे.

इतर युजर्स देखील समान दाव्यांसह तो फोटो व्हायरल करत आहेत.

तपास:

इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला २३ जून २०२३ रोजी अपडेट केलेल्या एका लेखात हा फोटो आढळून आला. ज्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीला सुमारे १८ राजकीय पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aaps-ultimatum-some-parties-reluctance-to-form-poll-alliance-tell-opposition-story/articleshow/101200126.cms?from= mdr

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वेबसाइटवरही आम्हाला हा फोटो आढळून आला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (भाषांतर): काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहार उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी, जेडी(यू) अध्यक्ष राजीव रंजन (लालन) सिंह (फोटो/ट्विटर/राहुल गांधी)

https://www.aninews.in/news/national/politics/nitish-tejashwi-meet-leaders-of-congress-aap-as-part-of-opposition-unity-efforts-for-2024-lok-sabha- battle-bjp-hits-back20230413005333/

आम्हाला वर्षभरापूर्वी झालेल्या बैठकीचा व्हिडिओ रिपोर्ट देखील मिळाला.

जनता दल (युनायटेड) च्या एक्स हँडलवरही आम्हाला हा फोटो आढळून आला.

कॅप्शनमधून समजते की, नितीश कुमार यांनी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीदरम्यानचा हा फोटो आहे, जो १२ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष:

२०२३ मध्ये मधील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानचा जुना फोटो आता भ्रामक दाव्यांसह शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल होणारा दावा दिशाभूल करणारा आहे.