सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करत त्यातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. फॉलोवर्सची संख्या वाढवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाताना दिसतात. कधीकधी तर या रिल्सच्या नादात अनेक जण आपला जीव गमावून बसतात. अशा घटना घडूनही लोक सुधारण्याचे नाव घेत नाहीत, उलट आणखी काही तरी नवीन गोष्टी ट्रेंड होतात आणि त्यावर लोक रिल्स शूट करू लागतात. अशातच एका शिक्षिकेचा एक रील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षिका चक्क पीपीयू परीक्षेचे पेपर तपासताना रील व्हिडीओ शूट करत असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शिक्षिका पेपर तपासण्याचे सोडून रील बनवण्यात मग्न

ज्या शाळेत मुलांना चांगले शिक्षण मिळावे, शिस्त लागावी म्हणून टाकले जाते, त्याच शाळेतील शिक्षक जर अशाप्रकारे वागत असतील तर मुलांचे भविष्य किती उज्ज्वल असू शकते, याची तुम्ही कल्पना करा. ही गोष्ट बिहारमधील पाटणा कॉलेजमधील आहे, ज्यात शिक्षिका चक्क पेपर नीट तपासण्याचे सोडून रील बनवण्यात मग्न आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता तर हद्द झाली! गर्दीने भरलेल्या मुंबई लोकलमध्ये कपलचा रोमान्स; एकमेकांना चिकटून….; Video व्हायरल

शिक्षिकेच्या कृत्यावर नेटकऱ्यांचा संताप

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला शिक्षिका शाळेच्या बाकावर बसलेली असून तिच्यासमोर अनेक उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. यावेळी शिक्षिकेने एक उत्तरपत्रिका उघडत ती तपासणे सुरू केले, यावेळी शिक्षिकेचे लक्ष उत्तरपत्रिकेकडे कमी पण कॅमेऱ्याकडे अधिक होते. अशाप्रकारे तिने कॅमेरामध्ये रील शूट करत उत्तरपत्रिका तपासली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर अनेकांनी तीव्र शब्दांत शिक्षिकेवर टीका केली आहे. विद्यार्थ्यांची ३ तासांची मेहनत शिक्षिकेने 30 सेकंदात मोजली. अशाप्रकारे पीएचडी मिळवा आणि प्रोफेसर बना, अशी टीका एका युजरने केली आहे.

हा व्हिडीओ @BiharTeacherCan नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “मॅडम जी कमाल करतायत, हा व्हिडीओ अपलोड करणे आवश्यक होते का?”, दुसऱ्या युजरने लिहिले की, त्या पेपर तर तपासत आहेत, पण उत्तरे काही वाचत नाही. तिसऱ्या युजरने लिहिले की, त्या न वाचता पेपर तपासत आहेत, म्हणूनच मुलं पेपरमध्ये गाणी लिहून येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अशा शिक्षकांची लाज वाटते, शिक्षकांचे नाव बदमान करतायत”, युजरची कमेंट

आणखी एका युजरने लिहिले, अशा शिक्षकांची लाज वाटते, शिक्षकांचे नाव या बदमान करत आहेत. मुलं १०० टक्के गुण मिळावे म्हणून रात्रंदिवस मन लावून अभ्यास करतात, पण या मॅडम उत्तरपत्रिकेत लिहिलेला एक शब्दही वाचत नाहीत, त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्था बिघडत आहे. जर मुलांना असे गुण देणार असाल तर परीक्षाच घेऊ नका. अशाप्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया युजर्सकडून दिल्या जात आहेत.