लडाखमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी मारुती सुझुकीच्या एका जाहिरातीच्या शूटिंगवर जोरदार टीका केली आहे. खासदारांनी मारुती सुझुकी कंपनीवर टीका करताना लडाखमधील एका घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. भाजपा खासदारांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये, लडाखमधील एका नदी पात्रात कारधावताना दिसत आहे. शिवाय या कारचा व्हिडिओ शेअर करताना खासदारांनी लडाखमधील ‘नाजूक इकोसिस्टम’ला त्रास देऊ नये, असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी @Maruti_Corp च्या बेजबाबदार जाहिरात कृत्याचा निषेध करतो. व्यावसायिक फायद्यासाठी नाजूक परिसंस्था नष्ट करू नये. मी प्रशासनाला शूटिंग थांबवण्याची आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करतो. पुढील पीढीसाठी लडाखचे अनोखे सौंदर्य जतन करूया,” असं नामग्याल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

हेही पाहा- “लज्जास्पद…” संपत्तीसाठी वकीलाने वृद्ध महिलेच्या मृतदेहालाही सोडलं नाही; कारमधील ‘तो’ Video पाहून नेटकरी संतापले

१५ सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मारुती जीम्नी SUV नदीच्या प्रवाहातून पळवळी जात असल्याचं दिसत आहे. तर यावेळी अनेक मोठमोठ कॅमेरे घेऊन काही लोक त्या कारच शूटिंग करताना दिसत आहेत. भाजप खासदार नामग्याल यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताच अनेकांनी तो शेअर केला आहे. शिवाय काही नेटकऱ्यांनी खासदारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर काहींनी विरोध केला आहे.

हेही पाहा- मोठ्याने हॉर्न वाजवणाऱ्या ड्रायव्हरचा आधी मानपान, पुन्हा भयंकर शिक्षा; Video पाहून नेटकरी म्हणाले, प्रत्येकाला अशी अद्दल घडवा

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लेहला जाणारी सर्व उड्डाणे थांबवा, एक्झॉस्ट वायू नाजूक इकोसिस्टमसाठी वाईट आहे. सर्व डिझेल वाहने थांबवा, एक्झॉस्ट वायू लडाखच्या नाजूक परिसंस्थेसाठी वाईट आहे. शिवाय ही परवानगी देण्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांना ही गोष्ट माहीत नव्हती का? मला येथे कोणतीही हानी दिसत नाही.” असा प्रश्न उपस्थित करत या नेटकऱ्याने खासदारांच्या भूमिकेचा विरोध केला आहे.

तर आणखी एकाने, “तुम्ही योग्य खासदार आहात आणि तुम्हाला हे योग्य नाही असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात हे कायदेशीररित्या थांबवू शकत नाही?” असं लिहित या नेटकऱ्यांनी खासदारांना प्रश्न विचारला आहे. अनेक नेटकऱ्यांनी लडाखच्या नैसर्गिक सौंदर्याचं करायला हवं असं कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp opposes maruti suzuki ad in ladakh demanded to stop shooting by tweeting a video jap
First published on: 11-04-2023 at 17:45 IST