scorecardresearch

कोल्ड ड्रिंक घेण्यासाठी तो प्लॅटफॉर्मवर आला; मात्र ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडला, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

Accident viral video: काळीज पिळवटून टाकणारा अपघाताचा VIDEO व्हायरल

boy fell on track while trying to climb in running train
ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडला ( Photo: Twitter)

Viral video: ट्रेन नेहमीच प्रवाशांनी गच्च भरलेली दिसते. काही प्रवासी तर जागा नसल्याने दरवाज्यातच उभे राहून प्रवास करताना दिसतात. मात्र यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील की ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना अपघात होऊन लोकांचा जीव गेला किंवा चालत्या ट्रेनमधून व्यक्ती पडला.

लांब पल्याच्या गाड्यांमध्ये असणारे प्रवासी प्लॅटफॉर्मवर कधी कधी उतरतात, अशावेळी पु्न्ही ट्रेन सुरु व्हायच्या आधी ट्रेनमध्ये चढण्याची त्यांची धावपळ असते. अशावेळी अपघात होण्याचीही शक्यता असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना बिहारमधून समोर आली आहे. बिहारमधील बगहा रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती रेल्वे रुळावर अचानक तोल जाऊन पडला, जेव्हा नेमकी त्याठिकाणहून ट्रेन जात होती. ट्रेन त्या व्यक्तीच्या अंगावरून पूर्णपणे गेली. मात्र, सुदैवाने तो वाचला.

After watching the video you will think 100 times before eating the fruit cake
फ्रूट केक आवडीने खाताय का? फॅक्टरीमधील Video पाहून केक खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल…
tharala tar mag marathi serial new twist pratima will save saylis life
सायलीला वाचवण्यासाठी प्रतिमा घेणार एन्ट्री, ‘या’ दिवशी असेल ‘ठरलं तर मग’ मालिकेचा विशेष भाग, प्रोमो आला समोर
Amchya Pappani Ganpati Anala Song Viral Anoter Little girl
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकलीचा Video होतोय तुफान व्हायरल
shah-rukh-khan-fan-watches-jawan-while-on-ventilator
Video : शाहरुख खानचा जबरा फॅन; व्हेंटिलेटरवर असणारा चाहता ‘जवान’ पाहण्यासाठी पोहचला चित्रपटगृहात

धावती ट्रेन पकडताना तोल गेला

मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तरुण बेतियाच्या उत्तरवारी पोखरा भागातील रहिवासी आहे. कोल्ड ड्रिंक आणि बिस्किटे घेण्यासाठी तो प्लॅटफॉर्मवर उतरला होता. खाद्यपदार्थ घेऊन तो परत ट्रेनच्या दिशेने गेला तेव्हा त्याला ट्रेन सुरू झाल्याचं दिसलं. ट्रेनने हळूहळू वेग पकडला. आपली ट्रेन चुकत असल्याचं पाहून त्या तरुणाने लगेच धाव घेतली. मात्र तिथेच तो फसला, व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरधाव वेगाने जाणारी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताच त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडला.

ट्रेन गेली अन्

त्याला ताबडतोब बाहेर काढता आलं नाही. कारण एक ट्रेन वरून जात होती. सर्वांनी त्याला शांत राहण्याचा आणि हालचाल न करण्याचा सल्ला देत आहेत, ट्रेन पुढे गेल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने आणि काही प्रवाशांनी त्याला रुळावरून उचललं आणि प्लॅटफॉर्मवर आणलं. या घटनेत त्याला थोडीफार दुखापत झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बाल्कनीत उभं राहून भांडत होतं कपल; तोल गेला अन् थेट तिसऱ्या मजल्यावरु खाली कोसळले दोघे, VIDEO व्हायरल

हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण म्हणताहेत की ती व्यक्ती नशिबाने वाचली,असे म्हणत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boy fell on track while trying to climb in running train shocking video viral srk

First published on: 03-10-2023 at 17:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×