Viral video: सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अलीकडे लोकांनी रिल बनवण्याचे इतके वेड लागले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोवर्ससाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी काही लोक कमी करत नाही. असाच एक तरुण रिलसाठी भर बाजारात चक्क ब्रा घालून आला अन् व्हिडीओ शूट करु लागला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणाचा प्रताप पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सध्या तरुणांना काहीही करुन व्हायरल व्हायचे आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. हेच या व्हिडीओतून समोर आलं आहे.

ही संतापजनक घटना पानीपतमधील गजबजाट असलेल्या एका बाजारात ही घडली आहे. याच ठिकाणी एक तरुण रील शूट करण्यासाठी आपल्या एका मित्रबरोबर आला होता. या तरुणीने शर्ट काढून अर्धनग्नावस्थेत व्हिडीओ शूट करु लागला. या तरुणीने शर्ट काढलं होतं आणि तो छातीवर महिलांचा ब्रा घालून व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. त्याला पाहून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना अवघडल्यासारखं झालं. त्यानंतर दुकानदारांनी आणि स्थानिकांनी या तरुणाला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकायलाच तयार नव्हता. अखेर काही दुकानादारांबरोबर झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. या तरुणाला दुकानादारांनी पुन्हा इथे दिसू नकोस असं सांगून पळवून लावलं. या तरुणाने शेवटी दुकनादारांसमोर हात जोडून माफी मागितली. आपली चूक झाली. भविष्यात माझ्याकडून असं काहीही होणार नाही, असा शब्द या तरुणाने दिला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>भयंकर! तुम्ही पाहू शकणार नाही असा VIDEO; चिमुकलीला शिक्षकाने हैवानासारखं मारलं, पाहून थरकाप उडेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Radhemahwa नावाच्या एक्स एकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. एकानं म्हंटलंय, रीलने लोकांच्या मनावर इतके अधिराज्य गाजवले आहे की, लाज उरली नाही. दुसऱ्या युजरने कमेंट केलीय की, आजकाल रीलसाठी काय चालले आहे ते माहित नाही. तर आणखी एकानं, यांना असाच मार बसला पाहिजे.