Boys Hostel Funny Poster Viral : अनेक पालक आपल्या मुलांना अभ्यासासाठी चांगले वातावरण मिळाले म्हणून हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी पाठवतात. जेणेकरून मुलं शांतपणे अभ्यास करू शकतील आणि परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतील. दरम्यान, अशा प्रकारे अभ्यासासाठी मोठ्या शहरांत आलेल्या मुलांसाठी अनेक ठिकाणी शहरांतील लोक आपल्या घरांत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतात. त्या बदल्यात त्यांना चांगले उत्पन्न कमावता येते. त्यासाठी काही जण आपल्या घरांवरच काही मजले बांधून हॉस्टेल बनवतात आणि बाहेरून आलेल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी त्या हॉस्टेलमध्ये सर्वोत्तम सुविधा देतात. अशा प्रकारे एका व्यक्तीने आपल्या घरावर मुलांसाठी बॉईज हॉस्टेल बांधले. त्यानंतर त्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी मालकाने हॉस्टेलमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जाणार याचं एक बॅनर लावलंय. या बॅनरवर त्यांनी असे काही लिहिले आहे की, वाचून अनेक तरुण आधीच विचारात पडलेत, तर अनेकांना त्यावरील माहिती वाचून हसू आवरणं अवघड झालं आहे. या हॉस्टेलवरील बॅनरचा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हॉस्टेलवरील बॅनरवर मालकाने कोणकोणत्या सुविधा दिल्या जाणार याची लिस्ट लिहिली आहे. व्हायरल फोटोत तुम्ही पाहू शकता की, हॉस्टेलमालकाने बॅनर लिहिलेय की, जीएस रेड्डी, बॉईज हॉस्टेल, मेस कार्ड सुविधा उपलब्ध, फ्री इंटरनेटसह वाईफ सुविधा उपलब्ध… यात वायफायच्या जागी मालकाने चुकून वाईफ शब्द लिहिला आहे; जो वाचून मुलांमध्ये या हॉस्टेलविषयी एक वेगळ्याच प्रकारचे प्रेम निर्माण झाले आहे. अनेक जण या हॉस्टेलमध्ये रूम मिळविण्यासाठी धाव घेत आहेत.

व्हायरल पोस्टर पाहिल्यास तुम्हाला दिसेल की, वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे तिथे चुकून वाईफ, असे झाले. पण, इंग्रजी स्पेलिंगच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ झाला; ज्यामुळे वाक्याचा संपूर्ण अर्थच बदलून गेला. त्यामुळे आता हे बॅनर पाहून अनेकांचा समज झाला की, खरंच या बॉईज हॉस्टेलमध्ये पत्नीचीही सुविधा उपलब्ध आहे.

हॉस्टेलचे बॅनर ठरले चर्चेचा विषय

हे बॉईज हॉस्टेलचे बॅनर नेमके कोणत्या ठिकाणावरील आहे, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण, मालकाने हे बॅनर आता त्याच्या घरावरील हॉस्टेलबाहेर लावल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.

View this post on Instagram

A post shared by @xml_mp4._

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॉस्टेलबाहेरील हे हास्यास्पद बॅनर @xml_mp4._ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंवरून शेअर करण्यात आले आहे, जे आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि त्यावर कमेंट केली. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, अविवाहित मुलांची आता खूप मज्जा आहे. दुसऱ्याने लिहिले की, आता हेच हॉस्टेल माझ्यासाठीही शेवटचा पर्याय आहे. तिसऱ्याने लिहिले की, हे हॉस्टेल कुठे आहे, लवकर सांग भाऊ, मला इथेच राहायचे आहे.