Viral video: सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसात मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या लग्नात प्रत्येक इव्हेंटच अगदी स्पेशल असतो. तशीच खास तयारी केली जाते नवरा नवरीच्या लग्नमंडपात होणाऱ्या एन्ट्रीसाठी. हल्ली लग्न मंडपात वधूची एन्ट्री कशी असेल याकडे वऱ्हाडी मंडळीचं लक्ष लागून असतं. यासाठी काही विशेष व्यवस्थापन केलं जातं. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका नवरा नवरीच्या कृतीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न लागताच नवरीनं आपल्या नवऱ्याच्या पाया पडली आहे. भारतीय संस्कृतीत आपला पती हा परमेश्वर असतो असे मानले जाते. मात्र विशेष म्हणजे जेव्हा नवरी नवरदेवाच्या पाया पडते तेव्हा नवराही नवरीच्या पाया पडतो. नवरदेवाच्या कृतीनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. यातूनच कळतंय की प्रेम दोन्ही बाजूनं असायला हवं. आदर हा दोन्ही बाजूनं असायला हवं.

स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करू न देणे हा प्रेमातला एक भाग आणि दुसऱ्याचं अस्तित्व हिरावून न घेणे हा दुसरा भाग. बुद्धांनी म्हटलं होतं, ‘फूल आवडतं तेव्हा स्वत:साठी तुम्ही ते तोडून घेता, पण जेव्हा तुमचं फुलावर प्रेम असतं तेव्हा तुम्ही ते तोडत नाही तर त्याची निगा राखता.’ प्रेमाचं नाणं म्हणूनच वाजवावं लागत नाही. ते वाजतंच! आणि ते वाजलेलं जगाला कळत नाही, पण ज्याला ऐकू यायचं त्याला ऐकू येतंच.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pallavi_vivek_story नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही नवरदेवाच्या कृतीचं कौतुक करत आहेत.