Viral video: लग्नात नवरी आणि नवरदेवाकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यांना पाहण्याची उत्सुकता पाहुण्यांना असते. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्सुकता खरंतर नवरा-नवरीला एकमेकांना पाहण्याची असते. दोघंही एकमेकांसमोर येतातच हृदयाची धडधड वाढते, पोटात गोळा येतो. काही जण तर थरथर कापू लागतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर एखादा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मणीय क्षण असतो. परंतु हाच क्षण एका तरुणासाठी खुपच अपमानास्पद ठरला. भर लग्नात सर्व पाहुण्यांसमोर नवरीने त्याच्या थोबाडीत मारली. सध्या तर एक आगळावेगळा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपात नवरदेवाला नवरीने चांगलाच धडा शिकवला आहे. भर मांडवात नवरीने थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावली. तिचा अवतार पाहून सर्वच अवाक् झाले. पण नक्की काय झालं? कसं झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर तुम्हीही पाहा हा व्हिडीओ

नवरदेवावर नवरी चांगलीच भडकली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मेजदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसमारंभ सुरु आहे. लग्न सोहळ्यात लग्नविधी सुरु असताना नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. याच वेळी समोर नवरदेव येतो तेव्हा तिला दारुचा वास येतो.नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीला दारुचा प्रचंड वास आला. त्यामुळे नवरी संतापली. तिचा पारा चढला. नवरदेवाला लग्नात शुद्धच राहिली नाही. त्यामुळे संतापलेल्या नवरीने थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावली. नवरीचा हा अवतार पाहून नवरदेव घाबरला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @Arhantt_pvt या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.