लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय असतो. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. त्यामुळेच लग्नाला सात जन्मांचे बंधन, असेही म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीबरोर तुम्ही शपथ घेतली आहे; त्याच्यासह तुम्हाला पुढचे सात जन्म जगायचे आहेत. पण, कधी कधी हे पवित्र नाते पहिल्याच जन्मात तुटते. अशाच प्रकारची एक घटना आता समोर आली आहे; ज्यात लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यामागे केक हे कारण बनले आहे. होय.. केकमुळे एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. नेमकी घटना काय आहे जाणून घेऊ …

सध्या घटस्फोटाच्या अनोख्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महिलेने तिच्या भावी पतीला सांगितले होते की, तिला गालावर केक लावणे आवडत नाही. असे असतानाही पतीने तिचा संपूर्ण चेहरा केकने रंगवला. या प्रकाराने संतापलेल्या पत्नीने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

महिलेने सांगितले की, तिचा लग्न करण्याचा कोणताही विचार नव्हता; पण २०२० मध्ये तिच्या प्रियकराने तिला अचानक लग्नासाठी प्रपोज केले, यावर तिने होकार दिला. पण, तिने क्लॉस्ट्रोफोबिकचा त्रास असल्याचे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे कोणीही तिला तोंडावर केक लावणे अजिबात आवडत नव्हते. ही गोष्ट माहीत असूनही लग्नानंतर झालेल्या रिसेप्शन सोहळ्यात त्याने पत्नीच्या चेहऱ्याला केक लावला. या प्रकारामुळे नववधूला धक्काच बसला आणि संतापलेल्या अवस्थेत ती तशीच खूप वेळ उभी राहिली. काही वेळाने रागावर नियंत्रण ठेवत ती मंडपातून सरळ निघून गेली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिने घटस्फोट मागितला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी नववधूचे वागणे अति असल्याचे म्हटले आहे. एका व्यक्तीने हा विनोद असल्याचे म्हणत यामध्ये घटस्फोट घेण्यासारखी काय गोष्ट होती मला समजली नाही, असे लिहिले आहे. तर एका युजरने लिहिले की, चांगले झाले मुलाची तिच्यापासून सुटका झाली. पण, असे काही लोक पुढे आले; ज्यांनी याला कमिटमेंटपासून वाचण्यासाठी वापरलेली टेक्निक म्हटले आहे. तर काहींनी मुलगा हुशार होता; त्याला मुलीला कशामुळे राग येईल हे माहीत होते म्हणून त्याने तसे केले, असे म्हटले आहे. सध्या हा घटस्फोट चर्चेचा विषय बनला आहे.