Bride Groom Video: सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये लग्नमंडपातील कॅमेऱ्यात कैद झालेले वेगवेगळे क्षण आपल्याला पाहायला मिळतात. कधी वधू-वर आपल्या डान्सने आणि रोमँटिक शैलीने लोकांची मने जिंकतात. तर कधी लग्नातील पाहुणे आपल्या फनी डान्समुळे सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता पुन्हा असाच एका लग्नमंडपातील व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये वधू आणि वर भर मंडपातच एकमेकांचे चुंबन घेत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भर लग्नमंडपातच रोमँटिक झाले वधू-वर

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर मंडपात लग्नाशी संबंधित विधी करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, भटजी मंगळसूत्र घालण्यास सांगतात. वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालताच रोमँटिक होतो आणि सगळ्यांसमोर तो वधूचे चुंबन घेतो. हे दृश्य पाहून सर्वजण क्षणभर थक्क होतात.

( हे ही वाचा: रोज चहाच्या स्टॉलला भेट देतो ‘हा’ प्राणी; IFS Officer ने शेअर केलेला Video एकदा पाहाच)

येथे रोमँटिक व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: Video: पिल्लांसाठी कोंबडीने घेतला रुद्रावतार! कोब्रावर झडप घालत…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वधू-वरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, witty_wedding नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ते अपलोड करण्यात आला आहे. यावर नेटिझन्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.