Haldi Function Viral Video: लग्नसमारंभ म्हटलं की आनंद, उत्साह आणि ढोल-ताशांचा जल्लोष ओघाने येतोच. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, मित्र-मैत्रिणींदेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. नुकताच सोशल मीडियावर अशाच एका विवाहसोहळ्यातील हळदी समारंभाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर डान्सचे बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) होत असतात. भारतीय लग्नात खाण्यापिण्यापासून पाहुण्यांचा मान-पान, कपडेलत्ते यावर पाण्यासारखा खर्च केला जातो. याचदरम्यान काही क्षण असे असतात जे कधीही विसरता येत नाहीत. लग्नात नवरा-नवरीचे आणि नातवाईकांचे डान्स व्हिडीओज बरेच व्हायरल होतात. त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींचेदेखील डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात.

भारतीय लग्नांमध्ये रंगत असते ती केवळ नवरा-नवरीमुळे नाही, तर त्या लग्नात होणाऱ्या विविध रसभरित परंपरांमुळे. त्यातही हळदी हा एक असाच सोहळा आहे, जो हसत-खेळत नवरा-नवरीच्या नव्या प्रवासाची सुरुवात करतो. पण, अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका हळदीच्या कार्यक्रमामधील व्हिडीओमध्ये सगळ्यांची नजर नवरीकडे नव्हे, तर तिच्या एका खास मैत्रिणीवर स्थिरावली आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, नवरी आपल्याच गप्पांमध्ये मग्न असताना तिची मैत्रीण अचानक कॅमेऱ्याकडे लक्ष देऊन नाचायला सुरुवात करते. तिच्या लाजऱ्या-गोजिऱ्या हसण्याने आणि कंबर लचकवत केलेल्या डान्सने उपस्थित सगळ्यांची मनं जिंकून घेतली आणि इतकंच नाही तर डान्स करताना ती थेट नवरीवर फुलांची उधळण करते, अगदी एखाद्या सिनेमातील सीनसारखं!

व्हिडीओ पाहणाऱ्यांना तिची निरागस अदा, लाजरी नजर आणि नखरेल हावभाव एवढे आवडलेत की अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करत तिच्या क्युटनेसचं भरभरून कौतुक केलं आहे.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @adultsutra या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला आणि हजारोंनी लाईक केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेक वापरकर्त्यांनी व्हिडिओवर कमेंट केली आणि वधूच्या मैत्रिणीच्या गोंडसपणाचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने लिहिले, “मला या रीलशिवाय दुसरे काहीही पहावसे वाटत नाही.” दुसऱ्याने लिहिले, “ती खूप गोंडस आहे. प्रत्येक लग्नात तिच्यासारखी मैत्रीण असावी जी गोंडसपणाने सर्वांचे मन जिंकते.”, अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.