Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला आपले बालपण आठवते. विशेषत: लहान बहीण-भावाचे खोडकर व्हिडीओ पाहून आपण अनेकदा बालपणीच्या आठवणींत रमतो. सध्या असाच एक बहीण-भावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेही बहीण-भाऊ एकमेकांबरोबर भांडण करीत एकमेकांना फटके देत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपले बालपण आठवू शकते.

हेही वाचा : Viral Video : छोट्या कार्ट्यांचा तुफान डान्स! त्यांचे हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, दोघे बहीण-भाऊ एकमेकांना मारताना दिसत आहेत. सुरुवातीला छोटा चिमुकला बहिणीला एक-दोन फटके मारतो, तेव्हा ती चिमुकली चिडते आणि भावाला मारायला सुरुवात करते. तेव्हा भाऊसुद्धा तिला पुन्हा मारायला लागतो. बहीण-भावाच्या या भांडणाचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : लहान मुलांच्या सीसॉवर बसली काकू अन् धाडकन आपटली तोंडावर… पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sdmthm या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सना आपले बालपण आठवले आहे. एका युजरने लिहिले आहे, व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण आली. तर, एका युजरने लिहिले आहे, मी आणि माझा भाऊ नेहमी असेच भांडतो.