माणूस आणि प्राण्यांचं नातं अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. माणसं जेवढी प्राण्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात, त्यापेक्षाही प्राणी माणसांना जास्त जीव लावतात. मुक्या जनावरांच्या या भावना ते नेहमीच त्यांच्या कृतीतून वेळोवेळी व्यक्त करीत असतात.

आजकाल गैरसोय, गैरवर्तणूक किंवा अन्य गोष्टींमुळे काही प्राणी धोकादायक ठरू लागले आहेत. ते कधीही, कुठेही येऊन कोणावरही हल्ला करू लागले आहेत. प्राणी खवळले तर ते कोणालाही ऐकत नाहीत. प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका माणसाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका बैलाने डान्स करत असलेल्या माणसालाच शिंगाने उडवलं. पुढे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या.

हेही वाचा… आयुष्याचा असा खेळ करू नका! सिलेंडरवर बसून चालत्या बाईकवर आजोबा करतायत स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका बैलाला फुलांनी सजवलं आहे. बैलाच्या बाजूला गावकरी गोळा झाले आहेत. तेवढ्यात अचानक एक माणूस येतो आणि बैलासमोर डान्स करू लागतो. बैलासमोर डान्स करू लागताच बैलदेखील उड्या मारू लागतो. डान्स करता करता माणूस इतका उत्साही होतो की तो बैलाच्या वेसणाला पकडतो आणि डान्स करू लागतो, यामुळे बैल चवताळतो आणि त्या माणसावर हल्ला करतो. शिंगाने त्या माणसाला उडवतो आणि तो माणूस खाली आदळतो.

हा व्हिडीओ @its_me_jo1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला दोन मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बैल म्हणेल, आ बैल मुझे मार”, तर दुसऱ्याने “बैलाला गाणं आवडलं नाही. ” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “बैलाला राग आला वाटतं.”