Bull Fighting Video : सोशल मीडियावर रोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून एकतर तुम्ही पोट धरुन हसता किंवा अचंबित होता. पण काहीवेळा असे काही व्हिडीओ असतात जे पाहिल्यानंतर तुमचा थरकाप उडतो. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात दोन बैल भररस्त्यात थरारक झुंज करत असल्याचे पाहायला मिळत आहे, हे दोन बैल एकमेकांवर असे काही तुटू पडतात की पाहणाऱ्यालाही धडकी भरेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन बैल एकमेकांशी भिडल्याचे दिसतेय. भररस्त्यात दोन्ही बैल एकामेकांशी भांडतात. यानंतर दोघे जोरजोरात धावत रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका कारला जोरात धडक देतात. एक बैल अक्षरश: पिसाळल्यासारखा कारच्या वरुन उडी घेत धावत सुटतो. त्याला पकडण्यासाठी म्हणून दुसरा बैल कारच्या टपावर चढण्याचा प्रयत्न करतो. दोन बैलांच्या या थरारक झुंजीत कारच्या बोनेट आणि वरच्या भागाचे मोठे नुकसान झाले. बैलांची ही झुंज पाहून रस्त्यावर उभे लोकही घाबरतात आणि बैलांपासून दूर जाण्यासाठी इकडे तिकडे पळू लागतात.

चालत्या स्कुटीवर जोडप्याचे अश्लील चाळे; VIRAL VIDEO पाहून संतापले लोक

 पाहा थरकाप उडवणारा व्हीडियो –

दरम्यान इन्स्टाग्रामवरील @ghantaa नावाच्या पेजवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांनी काहीश्या भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, चांगली गोष्टी ती मारुतीची कार नव्हती. दुसऱ्या युजरने लिहिले की, ते पोलीस भरतीसाठी उंच उडी मारण्याचा सराव करत होते. तिसऱ्या एका युजरने मजेशीर ढंगात लिहिले की, या प्रकरणी पुढील सुनावणी केव्हा होईल. अशाप्रकारे लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत.