एप्रिल महिना सुरु झाल्यापासून उन्हाचा प्रभाव वाढल्याचा जाणवत आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर शरीराशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामध्ये डोळेदुखी, डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे अनेकांना उन्हाळ्यात घरातून बाहेर पडायला नको वाटतं. कारण उन्हाचा त्रासच मोठ्या प्रमाणआत होत असतो. परंतु अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावंच लागतं. अशा परिस्थितीत लोक सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याऐवजी स्वत:च्या वाहनातून प्रवास करतात.

कार, किंवा दुचाकीवरुन प्रवास करायचा म्हटलं की, वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरावेच लागतेच. पण उन्हाळ्यात गाड्यांमध्ये इंधन भरताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात गाड्यांमध्ये जास्त प्रमाणात पेट्रोल भरल्यामुळे अनेकदा स्फोट होण्याच्या घटना घडत असतात. याबाबतचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो.

हेही पाहा- “Apple वरील निष्ठा…” अ‍ॅपल स्टोअरच्या उद्घाटनाला आलेल्या व्यक्तीच्या हातातील ‘ती’ वस्तू पाहून CEO झाले थक्क

सध्या सोशल मीडियावर असाच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गाडीत जास्त पेट्रोल भरु नका असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण जास्त इंधन भरल्यामुळे वाहनाच्या टाकीमध्ये स्फोट होऊ शकतो, अशी चेतावणी देण्यात येत आहे. तर या व्हायरल फोटोमध्ये उन्हाळ्यात वाहनांची काळजी कशी घ्यायची हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय अनेकांना

व्हायरल फोटोमधील सूचना –

हेही पाहा- झाडावर चढून अंडी चोरणाऱ्या मुलींना मोराने घडवली जन्माची अद्दल; Video पाहून नेटकरी म्हणाले, “चांगला धडा…”

व्हायरल फोटोतील मजकूर पुढीलप्रमाणे, ‘येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत तुमच्या वाहनात पेट्रोल भरू नका. यामुळे इंधन टाकीमध्ये स्फोट होऊ शकतो. कृपया तुमच्या वाहनातील इंधनाची अर्धी टाकी भरा आणि हवेसाठी जागा ठेवा. या आठवड्यात सर्वाधिक पेट्रोल भरल्यामुळे ५ गाड्यांमध्ये स्फोट अपघात झाले आहेत. तसेच दिवसातून एकदा पेट्रोलची टाकी उघडा आणि टाकीमध्ये साचलेला गॅस बाहेर काढा. शिवाय हा मेसेज तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांपर्यंत पोहचवा, धन्यवाद.’ असा मेसेज या फोटोतून देण्यात आला आहे. दरम्यान, अनेकजण या व्हायरल फोटोतील मजकूर खरा असल्याचं म्हणत आहेत. कारण उन्हाळ्याच्या दिवसात गाड्यांमध्ये जास्त पेट्रोल भरल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं लोक म्हणत आहेत.