दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. लोक आपला बराच वेळ इंटरनेटवर व्हिडीओ पाहण्यात घालवतात. सोशल मीडियावर दिवसाला अनेक निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धोकादायक, भावुक, थक्क करणारे व्हिडीओ असतात. प्राण्यांचेही अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच मांजरीचा एक व्हिडीओ समोर आलाय. सोशल मीडियावर मांजरीसंबधीत व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. आजकाल मांजरींवर फक्त मीम्स तयार होत नाही तर वेगवेगळे मजेशीर व्हिडिओ समोर येत आहेत.’कॅट लव्हर्स’ आपल्या मांजरीला जीवापाड जपतात.

पण काहीवेळा पाळीव प्राण्याने आपल्याच मालकावर हल्ला केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक मांजर आपल्याच मालकावर जबर हल्ला करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मांजर आधी मालकाच्या पायावर हल्ला करते, पण मालक बचावतो आणि चालत मांजराला हाकलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मांजराला अजू राग येतो आणि ती हात धुवून आपल्या मालकाच्या मागे पडते. मांजर हल्ला करण्यासाठी त्याच्या मालकाच्या पायावर लटकते. जेव्हा मालक सुटकेसाठी घरात घुसतो तेव्हा मांजरही मागून घरात घुसते. @Craxyclipsonly या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून पतीपत्नी घरात काम करत असताना मांजर व्यक्तीवर अचानक हल्ला करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेहे वाचा – लहानपण देगा देवा! ‘हा’ Viral व्हिडीओ तुम्हाला नक्की तुमच्या बालपणात घेऊन जाईल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व युक्त्या करूनही जेव्हा मांजर पाठलाग सोडत नाही, तेव्हा तिचा मालक घरात घुसतो आणि दरवाजा बंद करतो, परंतु मांजर एवढी चिडते की ती दारावर जोरात धडकू लागते. मग अचानक मांजरीला घराचा दरवाजा किंचित उघडलेला दिसला, मग मांजर पटकन आत शिरते. यानंतर मालक पुन्हा घाबरून घराबाहेर पडला. तेथे एक महिला देखील उपस्थित आहे जी त्याला मांजरीपासून वाचवण्याचा वारंवार प्रयत्न करते, परंतु मांजरीला थांबवू शकत नाही.