Viral video: आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त प्राण्यांचे पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होतात मग ते पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे. अशातच तुम्हाला मांजरींचे व्हिडीओही पाहायला मिळतील. बऱ्याच लोकांना मांजरींचे असे मजेदार आणि मनोरंजक व्हिडिओ पाहायला आवडतात, आता असाच एक मांजरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो नेटकऱ्यांना भलताच आवडलेला दिसतो आहे. तुम्ही आतापर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं असेल अगदी कावाळ्यालाही बोलताना आपण सर्वांनीच काही दिवसांपूर्वी पाहिलं.पण तुम्ही कधी मांजरीला बोलताना पाहिलंय का ?

अनेकांकडे घरी एखादी तरी मांजर असते, त्यामुळे मांजरीला बोलताना पाहिलंय का असं विचारलं तर अनेकजण म्हणतील वेड लागलंय का? पण खरंच एका बोलणाऱ्या नाहीतर रुसुन बसलेल्या आणि आपल्या मालकाशी चक्क मराठीत भांडणाऱ्या मांजरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

या व्हिडीओमधील तरुण मांदरीला घरी यायला सांगतोय. पण मांजर त्या तरुणावर नाराज आहे. त्यामुळे ती नकार देतेय. दरम्यान तरुण मध्ये मध्ये चल गं म्हणत गोड बोलून घरी यायला सांगतो. पण मांजरीच्या नाकावर राग स्पष्ट दिसतोय, ती त्याला थेट नकार देत त्याच्यावरच ओरडतेय. तरुण तिला म्हणतोय चल गं नाही मारणार यावर ती नाही म्हणत तरुणालाच दम देतेय. हा मांजरीचाही व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पहा.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खूपच अप्रतिम व्हिडिओ. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूप सुंदर.’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘खूप मजेदार व्हिडिओ.’