सोनसाखळी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे आपण बऱ्याचदा बातम्यांमध्ये वाचतो, ऐकतो. याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी साखळीचोरांना अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ मेरठ येथील आहे. दोन साखळीचोरांना अडवण्याचा प्रयत्न करताना एक मुलगी दिसत आहे. ते तिला ढकलण्याचा प्रयत्न करतात पण तरीही ती न घाबरता त्यांच्याकडुन साखळी परत मिळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवते. व्हिडीओबरोबर दिलेल्या कॅप्शननुसार या तरुणीच्या आजीची साखळी चोरून हे चोर पोबारा करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाच या तरुणीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाहा या घटनेचा व्हिडीओ.

आणखी वाचा: हे प्राणी आहेत की माणसं? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video

व्हिडीओ:

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमधील तरुणीच्या धाडसाचे नेटकरी कौतुक करत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शननुसार पोलिसांना या चोरांना पकडण्यात यश मिळाले.