Chhaava Movie viral video: नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. बॉलीवूड स्टार विकी कौशलने या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली असून सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्व चित्रपटगृहात लोक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

सोशल मीडियावर या चित्रपटासंबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यात अनेक लोकांनी चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींचे अश्रूच अनावर झाले आहेत. काहींनी तर थेट चित्रपटगृहातच शिवगर्जना केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, ज्यात चित्रपट पाहून झाल्यावर एक तरुणी शिवगर्जना करताना दिसतेय.

छावा चित्रपट पाहून तरुणीची शिवगर्जना

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये चित्रपट संपल्यानंतर एक तरुणी चित्रपटगृहात स्क्रिन खाली उभी राहून शिवगर्जना करताना दिसतेय. शिवगर्जना करताना दिसतेय. अगदी जेवढ्या जोरात जमेल तेवढा जोर काढून ती ही शिवगर्जना करतेय असं या व्हिडीओमधून दिसून येतंय. स्वत:ला त्रास होत असतानादेखील ही तरुणी जोरजोरात शिवगर्जना करतेय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @Liberal_India1 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘इतिहास हा डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या, हे आ ह साळुंखे सरांचे वाक्य किती महत्वाचे आहे. या मुलीचा विनाकारणचा अट्टाहास बघून प्रकर्षाने जाणवते.’,अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तिचे फॉलोवर्स बघा किती आहेत. याला शिवभक्ती नाही तर रील शूट म्हणता येईल.” तर दुसऱ्याने “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पॉडकास्टर्स फालतूगिरी करून व्यक्त होत आहे, त्यापेक्षा हे बर आहे, व्यक्त होऊ द्या तरुणांना! उगाच काड्या करणे बंद करा, कारायच्याच असतील तर योग्य ठिकाणी करा!” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “निव्वळ फालतू पणा सुरु आहे प्रसिद्धीसाठी” तर एकाने कमेंट करत लिहिलं, “ताईला दम लागला, एवढं सगळं फक्त प्रसिद्धीसाठी. मस्त. छान. जेवढं तिने गळा फाडून ओरडून बोललं त्या ओळींचा अर्थ तरी तिला माहिती असावा एवढीच अपेक्षा. “