scorecardresearch

Video : खेळणं समजून चिमुकल्यानं ६ फुटी सापाची शेपटी पकडली, घरात घुसताच सर्वांची झाली पळापळ अन्….

त्या लहान मुलानं मोठ्या सापाची शेपटी पकडल्याचं घरातील माणसांनी पाहिलं अन् जे घडलं….पाहा व्हायरल व्हिडीओ.

Child Vs Snake Viral Video
घरात घुसलेल्या सापाची चिमुकल्यानं शेपटी पकडली. (Image-Instagram)

Child Catches Snake Viral Video : घरात साप घुसल्यानंतर सर्वांचात थरकाप उडतो. साप दिसताच घरातील माणसं इकडे तिकडे पळ काढण्याचा प्रयत्न करतात. कारण सर्पदंश झाल्यावर माणसांना थेट मृत्यूच्या दारातच जावं लागतं. पण एका घरात थरकाप उडवणारी घटना घडलीय. एक मोठा साप घरात घुसल्यानंतर एका लहान मुलाच्या जवळ गेला. साप समोर दिसताच भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो. पण या चिमुकल्यानं सापाची थेट शेपटीच पकडली अन् जे घडलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सापांसोबत खेळ करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पण या चिमुकल्याच्या व्हिडीओनं एकच खळबळ माजवली आहे. कारण लांबलचक सापाची शेपटी पकडताना हा लहान मुलगा व्हिडीओत दिसत आहे.

विरल नावाच्या एका युजरने सापाचा हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक घरात खतरनाक साप घुतल्याचं दृष्य कॅमेरात कैद झालं आहे. साप दिसल्यानंतर घरातील माणसांनी पळ काढला पण लहान मुलाने त्या सापाची शेपटी पकडली अन् घरात फिरु लागला. चिमुकल्याच्या हातात साप दिसल्यावर घरातील माणसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि रुममध्ये बसलेल्या माणसांनी पळ काढायला सुरुवात केली. कारण एखाद्या खेळण्यासारखा तो लहान मुलगा घरात सापासोबत मस्ती करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आधी जेवणावर ताव मारला, बिल भरायची वेळ आली अन्… त्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

मुलाने शेपटी पकडल्यावर साप फणा काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याचदरम्यान तो मुलगा जोरात सापाला खेचतो आणि रुममध्ये फिरवतो. मुलाने सापाला पकडल्याचं पाहताच घरातील एक माणूस त्या मुलाची सापापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सापाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही भडकले. एका नेटकऱ्याने व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटलं, मुलाच्या आई-वडीलांनी तातडीनं मुलाला पकडायला पाहिजे होतं. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, कदाचित हा साप बिनविषारी असू शकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 18:07 IST