Viral Video : सोशल मीडियावर अनेक लहन मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक तीन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाने त्याच्या दोन मित्रांना चक्क बैल बनवून बैलगाडा शर्यत लावली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण येऊ शकते.
लहानपण देगा देवा..असं म्हणतात ते खरंय. लहापणीच्या आठवणी जगावेगळ्या असतात आणि लहानपणीचे मित्र हे आयुष्यात नेहमीच लक्षात राहतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला तिन मित्रांची सुंदर मैत्री दिसत आहे.

या तिघांनी लाकडी काठ्यांपासून एक बैलगाडी तयार केलेली दिसत आहे. या तिघांपैकी दोन बैल बनले असून एक जण बैल हाकलताना दिसत आहे. त्यांची ही खोटी खोटी बैलगाडा शर्यत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की या तिघांचाही पुढे तोल जातो आणि ते खाली पडतात. शर्यतप्रेमी मित्रांचा हा व्हिडीओ अनेकांना त्यांच्या बालपणीची आठवण करुन देईल.

हेही वाचा : तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

hichya_govala_kokan_dakhva या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शर्यतप्रेमी….स्वर्गाहुन सुंदर आपलं कोकण.येवा कोंकण आपलोच असा” या कॅप्शनवरुन कळते की हा व्हिडीओ कोकणातला असावा.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फुल्ल राडा” तर एका युजरने लिहिलेय, “नाद एकच एकच, एकच फक्त बैलगाडा शर्यत” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाद ओ नाद” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.