Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान चिमुकले डान्स करताना दिसतात तर कधी वृद्ध लोकं थिरकताना दिसतात. डान्सचा आनंद लुटणारे अनेक व्हिडीओ दर दिवशी सोशल मीडियावर चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकले ढोल ताशाच्या तालावर बॉलीवूड स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

ढोल आणि ताशा ही वाद्ये सणासुदीला आणि अनेक शुभ कार्यात आवर्जून वाजवली जातात. ढोल ताशा वाजवण्याची पद्धत विशेषत: महाराष्ट्रात आणि इतर राज्यात सुद्धा दिसून येते. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा चिमुकले ढोल ताशाच्या तालावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात ढोल ताशा वाजवताना दिसत आहे. या ढोल ताशाच्या तालावर काही चिमुकले डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला एक चिमुकला दिसेल त्याने चष्मा डोक्याच्या खाली मानेजवळ घातला आहे आणि डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे.तो कॅमेराकडे बघून सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर तो त्याच्या मित्रांना सुद्धा आवाज देतो आणि त्यांना कॅमेरा दाखवतो. त्यानंतर त्याचे मित्र आणि तो कॅमेराकडे बघून भन्नाट नाचताना दिसतात. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांचा डान्स पाहून बॉलीवूड फ्रि स्टाइल डान्सची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

people_call_me_ai_ke_xi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरे टॅलेंट” तर एका युजरने लिहिलेय, “हिरोसारखा नाचला भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावाने तर लक्ष वेधून घेतले.. याला म्हणतात स्वॅग” अनेक युजर्सना हा डान्स व्हिडीओ खूप आवडला. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टे इमोजी शेअर केले आहेत तर काहींनी या चिमुकल्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहेत.